T20I मध्ये मोहम्मद शमीचा गेम ओव्हर! सिलेक्टर्सनी शमीला त्याचा रोल केला स्पष्ट
आशिया कपसाठी टीम इंडियाची निवड होणार आहे. या स्पर्धेसाठी 15 ऐवजी 17 खेळाडूंची निवड होऊ शकते. या 17 खेळाडूंमध्ये मोहम्मद शमीच नाव नसेल.
नवी दिल्ली: आशिया कपसाठी टीम इंडियाची निवड होणार आहे. या स्पर्धेसाठी 15 ऐवजी 17 खेळाडूंची निवड होऊ शकते. या 17 खेळाडूंमध्ये मोहम्मद शमीच नाव नसेल. कारण टी 20 साठी मोहम्मद शमीचा विचार होणार नाही, हे निवड समितीने स्पष्ट केलं आहे. आता फक्त वनडे आणि कसोटी सामन्यांसाठी मोहम्मद शमीचा विचार करण्यात येईल. InsideSport ने हे वृत्त दिलं आहे. मोहम्मद शमी आपला शेवटचा टी 20 सामना टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये खेळला होता. टीम इंडियाने त्यानंतर हर्षल पटेल, दीपक चाहर अशा अनेक युवा गोलंदाजांना संधी दिली आहे. शमीचा पर्याय उपलब्ध व्हावा, हाच त्यामागे हेतू होता. शमी प्रमाणेच वॉशिंग्टन सुंदरही भारताच्या टी 20 वर्ल्ड कप 2022 प्लानचा भाग नाहीय.
T20I मध्ये मोहम्मद शमीचा गेम ओव्हर
“मोहम्मद शमी आता ताज्या दमाचा युवा क्रिकेटपटू राहिलेला नाही. त्याला कसोटीसाठी फिट ठेवायचं आहे. म्हणूनच त्याचा टी 20 साठी विचार होत नाहीय. मागच्या टी 20 वर्ल्ड कप नंतर आम्ही त्याच्याशी चर्चा सुद्धा केली होती. वर्कलोड मॅनेजमेंट नुसार आम्ही आता कसे पुढे जाणार आहोत. तो आमच्या टी 20 प्लानिंगचा भाग नाहीय. आम्ही फक्त युवा क्रिकेटपटूंवर लक्ष केंद्रीत केलय” असे टीम इंडियाच्या निवड समिती सदस्याने InsideSport ला सांगितलं.
आता टी 20 नाही फक्त वनडे आणि टेस्ट
क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेट मध्ये मोहम्मद शमी टीम इंडियाचा महत्त्वाचा सदस्य होता. त्याने आपला शेवटचा टी 20 सामना मागच्यावर्षी वर्ल्ड कप मध्ये खेळला होता. आता आशिया कप 2022 साठी संघ निवडून भारतीय निवडकर्त्यांना टीम इंडियाच चित्र स्पष्ट करायचं आहे. टी 20 वर्ल्डकप 2022 च्या संघात मोहम्मद शमी फिट बसत नाहीय. शमीला याबद्दल सिलेक्टर्सनी कल्पना दिली आहे. शमी प्रमाणेच वॉशिंग्टन सुंदरही आशिया कप आणि टी 20 वर्ल्ड कपसाठी संघात स्थान मिळवण्यात अयशस्वी ठरणार आहे. वॉशिंग्टन सुंदर बराच काळ दुखापतीच्या समस्येने त्रस्त आहे.