ENG vs AUS : लियाम लिविंगस्टोनचा झंझावात, ब्रूक-बेन डकेटचं अर्धशतक, ऑस्ट्रेलियासमोर 313 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
England vs Australia 4th Odi: इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 313 धावांचं आव्हान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाला हे आव्हान 39 षटकांमध्ये पूर्ण करायचं आहे.

इंग्लंड क्रिकेट टीमने चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 313 धावांचं आव्हान दिलं आहे. पावसामुळे 50 ऐवजी फक्त 39 षटकांचा खेळ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार इंग्लंडने 39 षटकांमध्ये 5 विकेट्स गमावून 312 धावा केल्या. इंग्लंडकडून कॅप्टन हॅरी ब्रूक आणि बेन डकेट या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तसेच इतर फलंदाजांनी चांगली साथ दिली. तर अखेरीस लियाम लिविंगस्टोन याने तोडफोड अर्धशतकी खेळी करत फिनिशिंग टच दिला. लियामने शेवटच्या षटकात मिचेल स्टार्कला झोडत 4 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 28 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला 300 पार मजल मारता आली. तर जेकब बेथल याने लिविंगस्टोन याला चांगली साथ दिली.
लिविंगस्टोन आणि बेथल या जोडीने सहाव्या विकेटसाठी नाबाद 71 धावांची भागीदारी केली. इंग्लंड या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर असल्याने त्यांच्यासाठी हा ‘करो या मरो’ असा सामना आहे. ऑस्ट्रेलियाकडे सामन्यासह मालिका जिंकण्याची दुहेरी संधी आहे. तर इंग्लंड मालिकेत बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात असणार आहे. आता ऑस्ट्रेलिया 313 धावां करत विजय मिळवते की इंग्लंड बरोबरी साधते, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
इंग्लंडची बॅटिंग
इंग्लंडकडून सर्वच्या सर्व फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र काहींना त्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही फिलीप सॉल्ट याने 22 धावा केल्या. विल जॅक्स 10 धावा करुन माघारी परतला. बेन डकेट याने 63 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन हॅरी ब्रूक याचं अवघ्या 13 धावांनी शतक हुकलं. ब्रूक 87 धावांवर बाद झाला. जेमी स्मिथने 39 धावा केल्या. तर त्यानंतर लियामस्टोन आणि बेथेल ही जोडी नाबाद परतली. लियामस्टोनने 27 चेंडूत नाबाद 62 धावांची विस्फोटक खेळी केली. तर बेथेलने नॉट आऊट 12 रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाकडून एडम झॅम्पा याने 2 विकेट्स घेतल्या. तर जोश हेझलवूड, कॅप्टन मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
लियाम लिविंगस्टोनचा झंझावात
Watch out, Livi about! 🚨 62 off 27 balls! 🤯 We put up 312 🏏💥 Live clips: https://t.co/zudFOQJQPi 🏴 #ENGvAUS 🇦🇺 | #EnglandCricket pic.twitter.com/DMeM0tIidf
— England Cricket (@englandcricket) September 27, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ॲलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, शॉन ॲबॉट, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : हॅरी ब्रूक (कर्णधार), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी स्मिथ (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, मॅथ्यू पॉट्स आणि आदिल रशीद.