ENG vs AUS : लियाम लिविंगस्टोनचा तडाखा, मिचेल स्टार्कला झोडला, एका ओव्हरमध्ये 28 धावा, व्हीडिओ
Liam Livingstone 28 Runs On Mitchell Starc Bowling Video : लियाम लिविंगस्टोन याने ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्क याची धुलाई करत अखेरच्या ओव्हरमध्ये 28 धावा कुटल्या. पाहा व्हीडिओ
इंग्लंडच्या लियाम लिविंगस्टोन याने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यातील शेवटच्या 39 व्या षटकात विस्फोटक खेळी करत संघाला 300 पार पोहचवलं आहे. पावसामुळे सामन्यातील 11 षटकांचा खेळ वाया गेल्या. त्यामुळे 39 ओव्हरचा खेळ निश्चित झाला. लिविंगस्टोन याने मिचेल स्टार्क याची धुलाई करत या शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 28 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 313 धावांचं अवघड आव्हान मिळालं आहे. इंग्लंड या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या सामन्यात चांगलीच रस्सीखेंच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
लियामने स्टार्कच्या या ओव्हरमध्ये 4 षटकार खेचले. तर एक चौकार लगावला. तर स्टार्कला एकच डॉट बॉल टाकता आला. लियामने ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर सिक्स ठोकला. त्यानंतर स्टार्कने दुसरा बॉल डॉट टाकला.त्यानंतर लियामने षटकारांची हॅटट्रिक पूर्ण केली. तर लियामेन अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकला. इंग्लंडने अशाप्रकारे 39 ओव्हरमध्ये 312 धावा केल्या.
सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
दरम्यान लियाम आणि जेकब बेथेल या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 71 धावांची नाबाद भागीदारी केली. जेकबने दुसऱ्या बाजूने लियामला चांगली साथ दिली. जेकबने नाबाद 12 धावा केल्या. तर लियामने 7 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आऊट 62 रन्स केल्या.
लियाम लिविंगस्टोनची फटकेबाजी, शेवटच्या ओव्हरमध्ये 28 धावा
6️⃣▪️6️⃣6️⃣6️⃣4️⃣
Incredible final over hitting from Liam Livingstone 💪💥
🏴 #ENGvAUS 🇦🇺 | @liaml4893 pic.twitter.com/qfEDxOM88N
— England Cricket (@englandcricket) September 27, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ॲलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, शॉन ॲबॉट, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : हॅरी ब्रूक (कर्णधार), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी स्मिथ (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, मॅथ्यू पॉट्स आणि आदिल रशीद.