ENG vs BAN | इंग्लंडच्या डेव्हिड मलानकडून जोरदार धुलाई, बांगलादेशला विजयासाठी 365 धावांचं आव्हान
England vs Bangladesh Icc World Cup 2023 | डेव्हिड मलानने केलेल्या तोडफोड बॅटिंगच्या जोरावर इंग्लंडने 350 मार मजल मारली. आता बांगलादेश कशाप्रकारे इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर बॅटिंग करतं हे पाहावं लागणार आहे.

धरमसाला | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील दुसऱ्या डबल हेडरमधील पहिला सामना हा इंग्लंड विरुद्ध बांगलादेश यांच्यात होत आहे. या सामन्यात इंग्लंडने बांगलादेशला विजयासाठी 365 धावांचं अवघड आव्हान दिलं आहे. डेव्हिड मलान याने केलेल्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 364 धावांपर्यंत मजल मारली. डेव्हिड मलान याने बांगलादेशच्या प्रत्येक गोलंदाजााची धुलाई करत जोरदार फटकेबाजी केली. इंग्लंडकडून डेव्हिड मलान याने सर्वाधिक 140 धावांची विस्फोटक खेळी केली.
बांगलादेशने टॉस जिंकून इंग्लंडला बॅटिंगसाठी पाचारण केलं. इंग्लंडने या निर्णयाचा फायदा करुन घेतला. डेव्हिड मलान आणि जॉनी बेयरस्टो या दोघांनी 115 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर बेरिस्टो 52 धावांची अर्धशतकी खेळी करुन माघारी परतला. जो रुट याच्यासोबत डेव्हिड मलान याने तुफान फटकेबाजी केली. या दरम्यान मलानने शानदार शतक ठोकलं. मलान भारतात शतक करणारा तिसरा इंग्रज ठरला. शतकानंतर मलान आणखी आक्रमक झाला. मात्र मेहदी हसन याने ही जोडी फोडून काढली. मला न 140 धावांवर आऊट झाला. मात्र तोवर मलान आणि जो रुट या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 151 धावांची भागीदारी केली.
मलान याने 107 बॉलमध्ये 16 चौकार आणि 5 सिक्स्या मदतीने 140 धावा केल्या. मलान आऊट झाल्यानंतर लियाम लिविंगस्टोन याचा अपवाद वगळता सर्वांनी योगदान दिलं. मात्र मोठी खेळी तसेच भागीदारी करण्यापासून बांगलादेशच्या गोलंदाजांनी रोखलं. बटलर 20, जो रुट 82, हॅरी ब्रूक 20, लिविंगस्टोन 0, सॅम करन 11, ख्रिस वोक्स 14 आणि आदिल रशीद याने 11 धावांचं योगदान दिलं. तर मार्क वूड याने नाबाद 6 आणि टोपली याने नॉट आऊट 1 रनचं योगदान दिलं.
बांगलादेशकडून मेहदी हसन याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. शोरिफूल इस्लाम याने 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर कॅप्टन शाकिब अल हसन आणि तास्किन अहमद या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
बांग्लादेश प्लेईंग ईलेव्हन | शाकीब अल हसन (कर्णधार), लिट्टन दास, नजमुल होसेन शांतो, तानझीद हसन, तौहीद, महमदुल्लाह रियाद, मुशाफिकूर रहिम (विकेटकीपर), मेहेंदी हसन, तंझीम साकीब, नासुम अहमद, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद, तस्कीन अहमद आणि मुस्तफीझूर रहमान.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, मोईन अली, जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड, बेन स्टोक्स, गस ऍटकिन्सन, डेव्हिड विली आणि रीस टोपली.