England vs India 3rd T20I live Score, streaming: सूर्यकुमार लढला, पण अखेर इंग्लंडने सामना जिंकला
England vs India 3rd T20I live Score, streaming Updates in Marathi: भारताने तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
IND vs ENG: : मालिकेतील अखेरच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात (T 20 Match) इंग्लंडला (IND vs ENG) विजय मिळाला. पण त्यासाठी सुद्धा इंग्लंडला संघर्ष करावा लागला. इंग्लंडने हा सामना 17 धावांनी जिंकला. भारताचा डाव 198 धावात आटोपला. इंग्लंडच्या संघाला शेवटच्या षटकापर्यंत संघर्ष करावा लागला, त्याचं कारण आहे फक्त (Suryakumar Yadav) सूर्यकुमार यादव. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 बाद 215 धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी 216 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. भारताने इंग्लंडला शेवटच्या षटकापर्यंत विजयासाठी झुंजवलं. सूर्यकुमार यादवने तर इंग्लंडच्या तोंडच पाणी पळवलं होतं. तो खेळपट्टीवर असेपर्यंत इंग्लंडचा संघ दबावाखाली होता.
LIVE Cricket Score & Updates
-
अखेर इंग्लंडने सामना जिंकला
मालिकेतील अखेरच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लंडला विजय मिळाला. पण त्यासाठी सुद्धा इंग्लंडला संघर्ष करावा लागला. इंग्लंडने हा सामना 17 धावांनी जिंकला. भारताचा डाव 198 धावात आटोपला. इंग्लंडच्या संघाला शेवटच्या षटकापर्यंत संघर्ष करावा लागला, त्याचं कारण आहे सूर्यकुमार यादव. ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली.
-
सूर्यकुमार यादव OUT
जबरदस्त फलंदाजी करणारा सूर्यकुमार यादव अखेर मोइन अलीच्या गोलंदाजीवर आऊट झाला. त्याने 55 चेंडूत 117 धावा केल्या. यात 14 चौकार आणि 6 षटकार आहेत.
-
-
सूर्यकुमारची सेंच्युरी
सूर्यकुमार यादवने 49 चेंडूत शानदार सेंच्युरी झळकवली. तो 102 धावांवर खेळतोय. त्याने 12 चौकार आणि 5 षटकार मारले. दिनेश कार्तिक 6 धावांवर विलीच्या गोलंदाजीवर आऊट झाला. 17 षटकात भारताच्या पाच बाद 167 धावा झाल्या आहेत.
-
भारताला 24 चेंडूत 61 धावांची गरज
16 षटकात भारताच्या चार बाद 154 धावा झाल्या आहेत.
-
सूर्यकुमार यादवचं तुफान, भारताच्या 150/3
सूर्यकुमार यादव तुफान फलंदाजी करत आहे. 15 षटकात भारताच्या तीन बाद 150 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार यादव 93 धावांवर खेळतोय. श्रेयस अय्यर 16 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 28 धावांवर आऊट झाला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी केली.
-
-
एका ओव्हरमध्ये 3 SIX
13 व्या षटकात सूर्यकुमार-श्रेयसने लिव्हिंगस्टोनला धुतलं. त्याच्या एका एका ओव्हरमध्ये 3 SIX मारले. तीन बाद 117 धावा झाल्या आहेत.
-
सूर्यकुमारची हाफ सेंच्युरी
सूर्यकुमार यादवने 32 चेंडूत शानदार हाफ सेंच्युरी झळकावली. यात सात चौकार आणि एक षटकार आहे.
-
सूर्यकुमारची फटकेबाजी
विराट, रोहित, ऋषभ आज लवकर बाद झाले. पण सूर्यकुमार यादवने डाव सावरला. श्रेयस अय्यर सोबत त्याची जोडी जमली आहे. 11 षटकात भारताच्या 91/3 धावा झाल्या आहेत.
-
सूर्यकुमार-श्रेयस अय्यरची जोडी मैदानात
8 षटकात भारताच्या 56/3 धावा झाल्या आहेत. रोहित शर्मा 11 धावांवर आऊट झाला. सूर्यकुमार यादव 26 आणि श्रेयस अय्यर 5 धावांवर खेळतोय.
-
भारताला दोन धक्के, विराट कोहली पुन्हा फ्लॉप
भारताची खराब सुरुवात झाली आहे. तीन ओव्हरमध्ये भारताच्या दोन विकेट गेल्या आहेत. ऋषभ पंत अवघ्या एक रन्सवर तर विराट कोहली 11 धावांवर बाद झाला. त्याने एक चौकार आणि एक षटकार लगावला. विलीच्या गोलंदाजीवर त्याने जेसन रॉयकडे झेल दिला. भारताची स्थिती 3.3 षटकात 16/2 आहे.
-
भारताला विजयासाठी 216 धावांचे टार्गेट
इंग्लंडने तिसऱ्या टी 20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 बाद 215 धावा केल्या आहेत. डेविड मलानने भारतीय गोलंदाजांनी भरपूर धुलाई केली. त्याने 77 धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोनने धावा केल्या. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 84 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. बुमराह आणि भुवनेश्वर कुमार आज खेळत नव्हते. त्याचा इंग्लंडच्या फलंदाजांनी पुरेपूर फायदा उचलला. रवींद्र जाडेजा, उमरान मलिक आणि आवेश खान यांची इंग्लंडच्या फलंदाजांनी यथेच्छ धुलाई केली. भारताला आज पावरप्ले मध्ये फक्त एक विकेट मिळाली भारतीय संघाने आजच्या तिसऱ्या शेवटच्या टी 20 सामन्यासाठी संघात चार बदल केले आहेत. रवी बिश्नोई, उमरान मलिक, श्रेयस अय्यर, आवेश खानचा संघात समावेश केला. हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहलला विश्रांती दिली. .
-
लियाम लिव्हिंगस्टोनची जबरदस्त फलंदाजी
18 ओव्हर मध्ये इंग्लंडच्या पाच बाद 190 धावा झाल्या आहेत. लियाम लिव्हिंगस्टोन 36 धावांवर आणि हॅरी ब्रुक 13 धावांवर खेळतोय.
-
रवी बिश्नोईचा डबल स्ट्राइक
अखेर रवी बिश्नोईने मलान-लिव्हिंगस्टोनची जोडी फोडली. दमदार फलंदाजी करणाऱ्या डेविड मलानने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विकेटकीपर ऋषभ पंतकडे झेल दिला. मलानने 39 चेंडूत 77 धावा फटकावल्या. यात 6 चौकार आणि 5 षटकार आहेत. मोइन अलीला सुद्धा बिश्नोईने आऊट केलं. त्याला खातही उघडू दिलं नाही. इंग्लंडच्या 17 षटकात 5/169 धावा झाल्या आहेत.
-
मलान-लिव्हिंगस्टोनची जोडी जमली
डेविड मलान आणि लियाम लिव्हिंगस्टोनची जोडी जमली आहे. इंग्लंडच्या 15 षटकात 3 बाद 152 धावा झाल्या आहेत. दोघेही भारतीय गोलंदाजांची धुलाई करत आहेत. मलान 77 धावांवर आणि लिव्हिंगस्टोन 14 धावांवर खेळतोय.
-
डेविड मलानची हाफ सेंच्युरी
13 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. इंग्लंडच्या तीन बाद 125 धावा झाल्या आहेत. डेविड मलानने 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. तो 62 धावांवर खेळतोय. यात 6 चौकार, 3 षटकार आहेत.
-
डेविड मलानची जबरदस्त फलंदाजी
12 ओव्हर्स मध्ये इंग्लंडच्या तीन बाद 111 धावा झाल्या आहेत. डेविड मलान 49 धावांवर खेळतोय.
-
10 ओव्हर्सचा खेळ पूर्ण
इंग्लंडच्या 10 षटकात 86/3 धावा झाल्या आहेत. डेविड मलान 27 आणि लियाम लिव्हिंगस्टोन 1 रन्सवर खेळतोय.
-
हर्षल पटेलच्या फुलटॉस बॉलवर फिल सॉल्ट बोल्ड
फिल सॉल्टच्या रुपायने इंग्लंडची तिसरी विकेट गेली आहे. सॉल्ट 8 धावांवर बाद झाला. हर्षल पटेलच्या फुलटॉस बॉलवर फिल सॉल्ट बोल्ड झाला.
-
आठ षटकांचा खेळ पूर्ण
आठ षटकात इंग्लंडच्या दोन बाद 71 धावा झाल्या आहेत. उमरानने या ओव्हरमध्ये जेसन रॉयची विकेट काढली.
-
उमरान मलिकने काढली विकेट
भारताला दुसरं यश मिळालं आहे. उमरान मलिकने चांगली फलंदाजी करणाऱ्या जेसन रॉयला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं आहे. त्याने रॉयला ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. रॉयने 26 चेंडूत 27 धावा केल्या. यात एक चौकार आणि दोन षटकार आहेत.
-
पावरप्ले पूर्ण, इंग्लंडची चांगली सुरुवात
6 ओव्हर्सचा पावरप्ले पूर्ण झाला आहे. इंग्लंडच्या एक बाद 52 धावा झाल्या आहेत. जेसन रॉय 23 धावांवर खेळतोय. यात एक चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. डेविड मलान 7 धावांवर खेळतोय. यात एक चौकार आहे.
-
रवींद्र जाडेजाच चौकार, षटकाराने स्वागत
रवींद्र जाडेजाचं चौकार, षटकाराने स्वागत करण्यात आलं आहे. पाच षटकानंतर इंग्लंडच्या 1 बाद 43 धावा झाल्या आहेत. जेसन रॉय 21 धावांवर खेळतोय. डेविड मलान त्याला साथ द्यायला मैदानात आला आहे.
-
आवेश खानने दिला झटका, इंग्लंडची मोठी विकेट
आवेश खानने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. कॅप्टन आणि सलामीवीर जोस बटलर 19 धावांवर बोल्ड झाला. बॅटची कड घेऊन बॉल स्टम्पवर आदळला. त्याने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला
-
रवी बिश्नोईने टाकलं तिसरं षटक
रवी बिश्नोईने तिसर षटक टाकलं. इंग्लंडच्या बिनबाद 27 धावा झाल्या आहेत.
-
उमरान मलिकच चौकाराने स्वागत
उमरान मलिकने दुसरं षटक टाकलं. जोस बटलरने या ओव्हरमध्ये उमरानची धुलाई केली. त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला. इंग्लंडच्या बिनबाद 19 धावा झाल्यात. बटलर 14 आणि रॉय 3 धावांवर खेळतोय.
-
आवेश खानने टाकलं पहिलं षटक
जेसन रॉय आणि जोस बटलर ही इंग्लंडची सलामीची जोडी मैदानात आली आहे. आवेश खानने पहिलं षटक टाकलं. इंग्लंडच्या बिनबाद 2 धावा झाल्या आहेत.
-
भारतीय संघातील बदल
रवी बिश्नोई, उमरान मलिक, श्रेयस अय्यर, आवेश खानचा संघात समावेश. हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहलला विश्रांती.
-
इंग्लंडची प्लेइंग 11
जोस बटलर (कॅप्टन), जेसन रॉय, डेविड मलान, फिल सॉल्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रुक, मोइन अली, डेविड विली, ख्रिस जॉर्डन, रिचर्ड ग्लीसन, रिसी टॉपली,
-
भारताची प्लेइंग 11
रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रवींद्र जाडेजा, हर्षल पटेल, आवेश खान, उमरान मलिक, रवी बिश्नोई,
-
इंग्लंडने टॉस जिंकला
इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Published On - Jul 10,2022 6:37 PM