IND vs ENG: पैशांसाठी पाकिस्तानची इज्जत विकणारा दीप्ती शर्माला म्हणाला चीटर
IND vs ENG: कोण आहे तो पाकिस्तानी क्रिकेटपटू, त्याला असं म्हणण्याचा काय अधिकार?

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट टीमची ऑलराऊंडर दीप्ती शर्मा चर्चेमध्ये आहे. याचं कारण आहे, ती केलेला रनआऊट. या विकेटमुळे इंग्लंडचा डाव संपला व टीम इंडियाने 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप केलं. झूलन गोस्वामीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करीयरमधील हा शेवटचा सामना होता. सध्या झूलन आणि भारतीय महिला टीमच्या क्लीन स्वीप विजयाबद्दल फार कमी चर्चा होतेय.
फक्त चर्चा आहे ती दीप्ती शर्माची. तुम्हाला पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद आसिफ आठवत असेल. त्याने फक्त काही पैशांसाठी पाकिस्तानची इज्जत विकायला काढली होती. हा मोहम्मद आसिफ आता दीप्ती शर्मावर प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. तिला चीटर म्हणतोय.
7 वर्ष बंदीची कारवाई
दीप्ती शर्माला चीटर म्हणणारा मोहम्मद आसिफ मॅच फिक्सिंगच्या आरोपांमध्ये तुरुंगात बंद होता. 2010 साली पाकिस्तानी टीम इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी मोहम्मद आसिफ स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकला होता. त्याच्यावर 7 वर्ष बंदीची कारवाई करण्यात आली. त्याशिवाय त्याला तुरुंगाची हवा खावी लागली होती.
त्यात कुठलीही फसवणूक नाहीय
त्यामुळे या मोहम्मद आसिफला दीप्ती शर्मावर टीका करण्याचा काय अधिकार आहे?. मूळात म्हणजे दीप्ती शर्माने घेतलेला रनआऊट आयसीसीच्या नियमांना धरुन आहे. त्यात कुठलीही फसवणूक नाहीय. त्यामुळेच अंपायरनी इंग्लिश महिला फलंदाजाला बाद ठरवलं.
We can see it clearly there is no intention of bowling the ball, she is looking towards non striker batter to cheat him. This is very unfair & terrible act worst spirit ?#mankading #mankad #Cheater#INDvsENG pic.twitter.com/SQCLYN3P7h
— Muhammad Asif (@MuhammadAsif26_) September 24, 2022
कितव्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला?
इंग्लंडची शेवटची जोडी फ्रिया डेविस आणि चार्ली डीन मैदानात होती. 44 व्या ओव्हरमध्ये दीप्ती चौथा चेंडू टाकणार होती. ती स्टम्पसजवळ पोहोचली. त्यावेळी नॉन स्ट्राइक एन्डवरुन चार्ली डीनने क्रीज सोडला होता. ती क्रीजच्या पुढे निघून गेली होती.
दीप्तीने लगेच आपला रन-अप थांबवून बेल्स उडवल्या. डीनला तिने रनआऊट केलं. 80 चेंडूत 47 धावांची खेळी करणारी चार्ली बाद झाली. इंग्लंडच्या त्यावेळी 153 धावा झाल्या होत्या. चार्ली बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव संपुष्टात आला. टीम इंडियाने हा सामना 16 धावांनी जिंकला.