ENG vs IND: ‘टीम मध्ये एक खेळाडू नाहीय, तोच टीम इंडियासाठी झटका’, संजय मांजरेकरांच महत्त्वाचं विधान
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाच्या फलंदाजांनी चिंता वाढवून ठेवली आहे. कारण सराव सामन्यातच कॅप्टन रोहित शर्मा, (Rohit sharma) शुभमन गिल, (Shubhaman Gill) हनुमा विहार आणि श्रेयस अय्यर फ्लॉप ठरले.
मुंबई: इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाच्या फलंदाजांनी चिंता वाढवून ठेवली आहे. कारण सराव सामन्यातच कॅप्टन रोहित शर्मा, (Rohit sharma) शुभमन गिल, (Shubhaman Gill) हनुमा विहार आणि श्रेयस अय्यर फ्लॉप ठरले. विराट कोहलीला स्वत:ची छाप उमटवता आली नाही. अशा परिस्थितीत जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड यांची गोलंदाजी कशी खेळणार? हा प्रश्न उपस्थित केला जातोय. भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी सुद्धा धोक्याचा इशारा दिला आहे. के एल राहुल टीम मध्ये नाहीय. तो भारतीय संघासाठी एक मोठा झटका आहे, असं संजय मांजरेकर (Sanjay manjrekar) यांनी म्हटलं आहे. केएल राहुलला ग्रोइनची दुखापत झालीय. त्याला उपचारांसाठी जर्मनीला पाठवण्यात आलय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्य़ा टी 20 सीरीजसाठी त्याला कॅप्टन म्हणून निवडण्यात आलं होतं. पण दुखापतीमुळे त्याने पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला माघार घेतली.
संजय मांजेरकर म्हणाले एकच चॅलेंज
केएल राहुल चांगल्या फॉर्म मध्ये आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याशिवाय मागच्यावर्षी त्याने चार सामन्यात 315 धावा फटकावल्या होत्या. 129 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. “राहुलच्या जागी दुसरा पर्यायी सलामीवीर असला, तरी पाहुण्यांसाठी म्हणजे टीम इंडियासमोर फलंदाजी मुख्य आव्हान आहे” असं संजय मांजरेकर सोनी स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला.
‘या’ तिघांकडून अपेक्षा
“केएल राहुल या कसोटीत खेळत नाहीय. हा टीम इंडियासाठी झटका आहे. पण श्रेयस अय्यर, हनुमा विहारी चांगली कामगिरी करतील, अशी अपेक्षा आहे. चेतेश्वर पुजारानेही कमबॅक केलंय” असं संजय मांजरेकर म्हणाले.
पहिल्याडावात 300 पेक्षा जास्त धावा
“पोकळी भरुन काढण्यासाठी टीम इंडियाकडे स्त्रोत उपलब्ध आहेत. भारताकडे दर्जेदार वेगवान गोलंदाजी आहे. फिरकी गोलंदाजीमध्येही चांगले पर्याय आहेत. मागच्यावेळ प्रमाणे यंदाही फलंदाजीचं मुख्य आव्हान असेल” असं संजय मांजरेकर म्हणाला. “वर्षभरापासून भारतीय संघ इंग्लंडमध्ये खेळलेला नाही. त्यामुळे पहिल्याडावात 300 पेक्षा जास्त धावा करणं आणि दुसऱ्याडावात मोठी धावसंख्या धावफलकावर उभारण हे चॅलेंज असेल” असं मांजरेकर म्हणाला. इंग्लंडमध्ये टीम इंडिया सध्या लीसेस्टरशायर विरुद्ध सराव सामना खेळत आहे. त्यानंतर 1 जुलैपासून इंग्लंड विरुद्ध कसोटी सामना सुरु होणार आहे.