इंटरनॅशनल मॅचमध्ये दोन टप्पी बॉलवर जोस बटलरचा SIX, असा षटकार तुम्ही कधी पाहिला नसेल, VIDEO
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या डावात 29 व्या षटकात एक वेगळीच गोष्ट पहायला मिळाली. वेगवान गोलंदाज पॉल वान मीकेरनने 5 वा चेंडू स्लोवर वन टाकला. प
मुंबई: जोस बटलर (Jos buttler) क्रिकेट विश्वातील दिग्गज फलंदाजांपैकी एक आहे. नेदरलँड विरुद्ध तिसऱ्या वनडे मध्ये त्याने 64 चेंडूत नाबाद 86 धावा फटकावल्या. त्याने 7 चौकार आणि 5 षटकार खेचले. त्याच्या फलंदाजीच्या बळावर इंग्लंडने 245 धावांचे लक्ष्य फक्त 30.1 षटकातच गाठले. इंग्लंडने 119 चेंडू बाकी ठेऊन नेदरलँडवर मोठा विजय मिळवला. इंग्लंडने या वनडे मालिकेत (ODI Series) 3-0 ने क्लीन स्वीप केलं. मालिकेत बटलरला दोन वेळा फलंदाजीची संधी मिळाली. त्याने दोन अर्धशतक फटकावली. तो एकदाही बाद झाला नाही व सर्वाधिक 248 धावा केल्या. जोस बटलरला मॅन ऑफ द सीरीज म्हणजे मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. नेदरलँड विरुद्धच्या (ENG vs NED) या मालिकेत त्याने 14 चौकार आणि 19 षटकार ठोकले. म्हणजे 170 धावा फक्त बाउंड्री मधून वसूल केल्या. आयपीएल 2022 मध्ये पण त्याने दमदार फलंदाजी केली होती. त्यामुळे तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता.
बटलरवर काही परिणाम झाला नाही
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या डावात 29 व्या षटकात एक वेगळीच गोष्ट पहायला मिळाली. वेगवान गोलंदाज पॉल वान मीकेरनने 5 वा चेंडू स्लोवर वन टाकला. पण हा चेंडू दोन टप्पी पडला. हा बॉल लेग साइडवरुन पीचच्या बाहेर जात होता. पण बटलरवर त्याचा काही परिणाम झाला नाही. त्याने त्या बॉलवर फाइन लेगच्या दिशेने षटकार ठोकला. नियमानुसार, कुठलाही चेंडू पीचच्या बाहेर जातो, त्यावेळी त्याला नोबॉल ठरवलं जातं. त्यामुळे बटलरला फ्री हिट मिळाला. त्याने तो चेंडू सुद्धा प्रेक्षक गॅलरीत पाठवला.
?????? pic.twitter.com/SYVCmHr2iD
— Sachin (@Sachin72342594) June 22, 2022
टी 20 मध्ये बटलरच्या नावावर किती धावा?
जोस बटलरने 151 वनडे सामन्यात 125 डावात 41 च्या सरासरीने 4120 धावा केल्या आहेत. 121 चा त्याचा स्ट्राइक रेट आहे. त्याने 10 शतकं आणि 21 अर्धशतकं झळकावली आहेत. तो टी 20 क्रिकेटमधला धोकादायक फलंदाज आहे. 88 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने 35 च्या सरासरीने 2140 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 15 अर्धशतकं आहेत. इंग्लंडकडून तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक ठोकणाऱ्या निवडक खेळाडूंमध्ये जोस बटलरचा समावेश होतो. त्याने एकूणच टी 20 क्रिकेटमध्ये 315 सामन्यात 8198 धावा केल्या आहेत. यात 6 सेंच्युरी आणि 54 अर्धशतकं आहेत. 60 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 145 चा आहे.