इंग्लंडचा टिम ब्रेसनेन रिटायर, सचिनला आऊट केल्यामुळे मिळाली होती जीवे मारण्याची धमकी
निवृत्तीचा निर्णय माझ्यासाठी सर्वात कठीण होता. पण क्रिकेट सोडण्याची हीच योग्य वेळ आहे, असं त्याने सांगितलं.
लंडन: इंग्लंडचा ऑलराऊंडर टिम ब्रेसनेनने (Tim Bresnan) आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इंग्लंडसाठी लकी चार्म म्हटल्या जाणाऱ्या टिम ब्रेसनेनने सोमवारी निवृत्तीचा निर्णय (Tim Bresnan Retires) जाहीर केला. तो 36 वर्षांचा आहे. निवृत्तीचा निर्णय माझ्यासाठी सर्वात कठीण होता. पण क्रिकेट सोडण्याची हीच योग्य वेळ आहे, असं त्याने सांगितलं. मी माझ्या संपूर्ण करीयरमध्ये प्रचंड मेहनत केली. पण मी माझ्या निर्धारीत लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. क्रिकेटसाठी तेच प्रेम आणि जोश माझ्या मनात कायम राहिल असं त्याने सांगितलं. निवृत्तीचा निर्णय कठीण होता. पण मी ट्रेनिंगसाठी परतलो, तेव्हा मला माझा निवृत्तीचा निर्णय योग्य वाटला, असे ब्रेसनेन म्हणाला. यॉर्कशर आणि इंग्लंड संघाचे प्रतिनिधीत्व करायची संधी मिळाली हा मी सन्मान समजतो. सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) 100 व्या शतकापासून रोखणारा टिम ब्रेसनेनचा होता. सचिनला शतक बनवण्यापासून रोखल्याबद्दल त्याला जीवे मारण्याची धमकी सुद्धा मिळाली होती.
ओव्हल कसोटी सामन्यात चौथ्या डावात सचिन तेंडुलकरला 91 धावांवर आऊट केल्यानंतर ब्रेसनेन आणि अंपायर रॉड टकर या दोघांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. या धमक्यानंतर अंपायर टकर यांनी आपली सुरक्षा वाढवली होती. टिम ब्रेसनेनने आपल्या संपूर्ण करीयरमध्ये 12 हजार पेक्षा जास्त धावा केल्या व 1हजारपेक्षा जास्त विकेट घेतल्या.
टिम ब्रेसनेनचं करीयर टिम ब्रेसनेन इंग्लंडसाठी 23 कसोटी, 85 वनडे आणि 34 टी-20 सामन्यांमध्ये खेळला. त्याने संपूर्ण आंतरराष्ट्रीय करीयरमध्ये चार अर्धशतक झळकावली. वनडेमध्ये त्याने 109 विकेट घेतल्या. कसोटीमध्ये 72 विकेट काढल्या.