मोठी बातमी: भारताकडून पराभूत झाल्यानंतर Ben Stokes ची वनडे क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा

इंग्लंडचा सुपरस्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्सने (Ben Stokes) वनडे (ODI) क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

मोठी बातमी: भारताकडून पराभूत झाल्यानंतर Ben Stokes ची वनडे क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा
Ben stokesImage Credit source: twitter/ben stokes
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 6:17 PM

मुंबई: इंग्लंडचा सुपरस्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्सने (Ben Stokes) वनडे (ODI) क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. स्टोक्सने सोमवारी 18 जुलैला आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन वनडे फॉर्मेट मधून निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. कालच वनडे मालिकेत भारताने इंग्लंडचा पराभव करुन मालिका 2-1 अशी जिंकली. मंगळवारी 19 जुलैला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (England vs South Africa) होणारा पहिला वनडे सामना त्याच्या वनडे करीयरमधील शेवटचा सामना असेल. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये मंगळवारपासून 3 वनडे सामन्यांची मालिका सुरु होत आहे. पहिला सामना डरहम येथे खेळला जाणार आहे. स्टोक्स आपल्या होम ग्राऊंडवरुनच ODI क्रिकेटला निरोप देणार आहे.

वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये महत्त्वपूर्ण योगदान

वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी बेन स्टोक्सने वनडे क्रिकेटला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. बेन स्टोक्स इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या संघात होता. तीन वर्षांपूर्वी जुलै महिन्यात स्टोक्स लॉर्ड्सच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध फायनलमध्ये 84 धावांची नाबाद इनिंग खेळला होता. हा सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला होता. सुपर ओव्हर मध्ये सुद्धा मॅच टाय झाली. पण त्यावेळी जास्त चौकार मारल्यामुळे इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आलं. स्टोक्सला त्या इनिंगसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

हा निर्णय घेणं खूप कठीण होतं

अलीकडेच बेन स्टोक्सची इंग्लंडच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली. त्याने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट केली आहे. त्यात त्याने इतक्या लवकर निवृत्ती घेण्यामागचं कारण सांगितलय. “मी मंगळवारी डरहम येथे इंग्लंडकडून वनडे क्रिकेट मध्ये शेवटचा सामना खेळणार आहे. या फॉर्मेट मधून निवृत्त होण्याचा मी निर्णय घेतलाय. हा निर्णय घेणं खूप कठीण होतं. आपल्या संघ सहकाऱ्यांसोबत इंग्लंडकडून खेळताना मी प्रत्येक क्षणाला क्रिकेटचा आनंद घेतलाय. माझा प्रवास खूपच संस्मरणीय आहे” असं स्टोक्सने पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

आता माझं शरीर साथ देत नाहीय

“हा निर्णय घेणं भले माझ्यासाठी कठीण होतं. पण तथ्याचा सामना करण्यापेक्षा जास्त कठीण नव्हतं. या फॉर्मेट मध्ये मी माझे सहकारी आणि इंग्लंडसाठी 100 टक्के योगदान देऊ शकत नाही. तीन फॉर्मेट माझ्यासाठी भरपूर जास्त आहेत. संघाचा कार्यक्रम आणि माझ्याकडून असलेल्या अपेक्षा लक्षात घेता, आता माझं शरीर साथ देत नाहीय. माझ्याजागी दुसरा खेळाडू पूर्ण क्षमतेने 100 टक्के न्याय देऊ शकतो, मी त्याची जागा अडवतोय, असं मला वाटत होतं” असं स्टोक्सने त्याच्या निवृत्तीच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

असं आहे स्टोक्सच करीयर

फलंदाजी आणि गोलंदाजीने महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या बेन स्टोक्सने 2011 साली वयाच्या 20 व्या वर्षी 2011 साली आयर्लंड विरुद्ध वनडे मध्ये डेब्यु केला होता. तो इंग्लंडकडून 104 वनडे सामने खेळला. त्यात त्याने 2919 धावा केल्या. यात 3 शतक आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सरासरी 39 पेक्षा जास्त आणि स्ट्राइक रेट 95 पेक्षा जास्त होता. गोलंदाजी करताना त्याने 74 विकेट घेतले. भारताने काल इंग्लंडला वनडे सीरीज मध्ये पराभूत केलं. त्यानंतर दुसऱ्याचदिवशी स्टोक्सने हा निर्णय जाहीर केला. वनडे मधून बेन स्टोक्स निवृत्त झाला असला, तरी तो त्याचं आता पूर्ण लक्ष कसोटी आणि ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी 20 वर्ल्ड कप वर देणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.