IPL 2021: राजस्थान रॉयल्स संघाला आणखी एक झटका, बटलर, स्टोक्स, आर्चरनंतर आणखी एक इंग्लंडवासी दुखापतग्रस्त

राजस्थान रॉयल्स संघात दुखापतींसह इतर कारणांमुळे दिग्गज खेळाडू उर्वरीत आयपीएलला हुकण्याचं जणू सत्रच सुरु आहे. बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर नंतर आता आणखी एका इंग्लंडच्याच खेळाडूला दुखापत झाली आहे.

IPL 2021: राजस्थान रॉयल्स संघाला आणखी एक झटका, बटलर, स्टोक्स, आर्चरनंतर आणखी एक इंग्लंडवासी दुखापतग्रस्त
लियाम लिव्हिंगस्टोन
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 2:55 PM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2021) उर्वरीत पर्वासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. सर्व संघ संघ नियोजन करण्यात व्यस्त आहेत. काही नवीन खेळाडूही आयपीएलमध्ये सामिल झाले आहेत. पण राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघातील खेळाडू मात्र विविध कारणांमुळे स्पर्धेबाहेर होत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये बहुतेक खेळाडू हे इंग्लंडचेच आहेत. आधी बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर यांच्यानंतर आता लियाम लिव्हिंगस्टोनला (liam livingstone)  गंभीर दुखापत झाल्यामुळे तोही उर्वरीत आयपीएलला हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे आय़पीएल (IPL 2021) मध्येच थांबवण्यात आली. त्यानंतर आता उर्वरीत आयपीएलला पुन्हा 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरुवात होणार आहे. यासाठी काही नवीन खेळाडू वेगवेगळ्या संघात समाविष्ट करण्यात आले आहेत. राजस्थानचा संघातून मात्र एक एक खेळाडू कमी होत आहे. सर्वात आधी दुखापत झाल्यामुळे जोफ्रा आर्चरने माघार घेतली. ज्यानंतर बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी खाजगी कारणं देत स्पर्धेला राम राम ठोकला. आता फलंदाज लियामला इंग्लंडमध्ये वारविकशायर आणि लँकशायर दरम्यान सुरू असलेल्या काउंटी चॅम्पियनशिपच्या (county championship) एका सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. सीमारेषेवर चौैकार अडवताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली असल्याने तोही उर्वरीत आयपीएलला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जगातील नंबर 1 टी-20 बोलर राजस्थान रॉयल्समध्ये

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने जगातील नंबर 1 टी-20 गोलंदाजाला संघात समाविष्ट केलं आहे. हा खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिका संघाचा तबरेज शम्सी (Tabraiz Shamsi). आयपीएलच्या (IPL 2021) उर्वरीत पर्वात तबरेज शम्सी हा राजस्थानचा वेगवान गोलंदाज अँड्रयू टायच्या (Andrew Tye) जागी खेळताना दिसणार आहे. टायने उर्वरीत आयपीएलमधून कोरोनाच्या कारणामुळे माघार घेतली आहे. राजस्थानचा मुख्य गोलंदाज जोफ्रा आर्चरही दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेल्याने त्याच्या जागी ग्लेन फिलीप्सला संधी देण्यात आली आहे.

हे ही वाचा

IPL 2021 : आयपीएलच्या उर्वरीत पर्वामध्ये 9 खेळाडूंची अदला-बदली, वाचा सगळे बदल एका क्लिकवर

IPL 2021 : चेन्नईचा स्टार क्रिकेटर सुरेश रैना म्हणतो, मी JOHN CENA, पाहा रैनाचा WWE स्टंट

IPL 2021 : आरसीबी संघाला मोठा झटका, दुखापतीमुळे धाकड खेळाडू संघाबाहेर, बदली खेळाडू म्हणून ‘या’ युवा खेळाडूची निवड

(England batsman liam livingstone got injured he may miss IPL 2021 from rajsthan royals)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.