मुंबई: इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) सोमवारी (20 सप्टेंबर) पाकिस्तानचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडने सुरक्षेची कारणं देत दौरा रद्द केल्यानंतर इंग्लंडकडूनही असा निर्णय़ घेण्यात आल्याने पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला. पण या निर्णयाचा फायदा इंडियन प्रिमीयर लीगला (IPL 2021) झाला आहे.
आता तुम्ही म्हणाल पाकिस्तान आणि इंग्लंड दौऱ्याचा आय़पीएलशी काय संबध? तर सध्या आयपीएलचं उर्वरीत पर्व सुरु आहे. त्यातच 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी इंग्लंड संघ पाकिस्तानमध्ये दोन टी-20 सामने खेळण्यासाठी जाणार होता. याच दरम्यान आय़पीएलचे महत्त्वाचे सामने असल्याने आयपीएलमध्ये खेळणाऱ्या इंग्लंडच्या खेळा़डूंना पाकिस्तानला जावे लागले असते. पण आता हा दौरा रद्द झाल्याने या खेळाडूंना संपूर्ण आयपीएल खेळता येणार आहे.
इंग्लंड जर पाकिस्तानच्या दौैऱ्यावर गेला असता तर आय़पीएलमध्ये खेळणारे इंग्लंडवासी सुद्धा परतले असते. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सचे महत्त्वाचे खेळाडू सॅम करन आणि मोईन अली यांना परतावे लागले असते. त्यामुळे चेन्नईला सर्वाधिक तोटा झाला असता. याशिवाय केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनलाही परतावं लागलं असतं.ज्यामुळे केकेआरलाही चांगलाच तोटा झाला असता.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दौरा रद्द करताना ट्विट करत याबाबतची माहिती दिली. या माहितीत त्यांनी म्हटलं आहे की, ‘आमच्यासाठी खेळाडूं आणि सपोर्ट स्टाफचं मानसिक आणि शाररिक आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे. सध्याची परिस्थिती पाहता कोणत्याही प्रकारचा प्रवास धोक्याचाच आहे. त्यात त्या भागात दौऱ्यासाठी जाण्याने खेळाडूंवर ताण वाढेल. त्यात कोरोनासंबधी नियम आणि एकदरीत तणावामुले आगामी टी-20 विश्वचषकासाठी आमच्या टी-20 संघावरही याचा परिणाम होईल. या सर्वामुळे आम्ही हा निर्णय़ घेत आहोत.’
“We can confirm that the Board has reluctantly decided to withdraw both teams from the October trip.”
?? #PAKvENG ???????
— England Cricket (@englandcricket) September 20, 2021
हे ही वाचा
IPL 2021: धोनी-रोहितला मागे टाकत कोहलीच्या नावे नवा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
वीरेंद्र सेहवागने उधळली स्तुतीसुमने, एमएस धोनीचा केला उदो उदो, म्हणाला…
(England canceled Pakistan tour benefits IPL as england players will play in remaining IPL)