“विराट कोहलीला कर्णधारपदावरुन हटवणं क्रिकेटमधील अपराध ठरेल”

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडकडून 8 विकेट्सने पराभूत झाला. त्यामुळे मागील काही काळ सुरु असल्याप्रमाणे महत्त्वाच्या स्पर्धेत अखेरच्या काही सामन्यात भारताचं पराभूत होण्याचा सिलसिलाही कायम राहिला. दरम्यान या पराभवचं खापर सर्वात जास्त कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) फोडलं जात असताना विराटच्या समर्थनार्थ इंग्लंडचा माजी दिग्गज खेळाडू उभा राहिला आहे.

विराट कोहलीला कर्णधारपदावरुन हटवणं क्रिकेटमधील अपराध ठरेल
विराट कोहली (भारतीय कर्णधार)
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 3:49 PM

मुंबई : संपूर्ण आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (ICC World Test Championship) भारतीय संघाने उत्कृष्ट प्रदर्शन दाखवले. दोन वर्ष अप्रतिम खेळ करत ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या संघाना पराभूत करुन अंतिम सामना गाठला. मात्र अंतिम सामन्यात पोहोचलेला भारतीय संघ न्यूझीलंडकडून 8 विकेट्सने पराभूत झाला. ज्यानंतर कर्णधारपद भूषवत भारताला इथवर घेऊन आलेल्या विराट कोहलीवरच (Virat Kohli) पराभवचं सर्व खापर फोडलं जाऊ लागलं. मात्र असे असतानाच इंग्लंडचे माजी दिग्गज फिरकीपटू ग्रेम स्वान (Graeme Swann) यांनी विराटचे समर्थन करत अशावेळी ‘कोहलीला कर्णधार पदावरुन हटवणं म्हणजे क्रिकेटमधील अपराध ठरेल’ असं वक्तव्य केलं आहे. (England Cricket legend Graeme Swann Supports Virat Kohli Captaincy eveb After Lost In WTC Final Against New Zealand)

विराट कोहली कर्णधार झाल्यापासून भारतीय संघ तीन मोठ्या आय़सीसी टूर्नांमेंटमध्ये खेळला. यात पहिले 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी, नंतर 2019 विश्व चषक आणि आथा 2021 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship Final 2021). मात्र या तिन्हीमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला. ज्यात 2017 आणि 2021 मध्ये अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्याने कोहलीच्या कर्णधारीवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उठवले जात आहेत. कोहली एक चांगला खेळाडू असला तरी कर्णधार म्हणून चांगला नसल्याची प्रतिक्रिया अनेकजण देत असून कोहलीला कर्णधारपदावरुन हटवण्याची मागणी करत आहेत. मात्र इंग्लंडचे माजी दिग्गज फिरकीपटू ग्रेम स्वान यांनी कोहलीची बाजून घेत त्याचे समर्थन केले आहे. स्वान स्पोर्ट्सकिडाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. ते म्हणाले ”विराट कोहली एक चॅम्पियन आणि सुपरस्टार आहे. त्याने भारतीय संघाला मजबूत बनवलं आहे. प्रत्येक विकेटनंतर कोहलीचा जोश बघण्याजोगा असतो. तो संपूर्ण सामन्यात संघाचा आत्मविश्वास वाढवून स्वत:ला 100 टक्के समर्पित करतो. त्यामुळे इतका चांगला कर्णधार असताना त्याला हटवण्याची काही गरज नाही. असे करणे क्रिकेटमधील अपराध होऊ ठरेल.”

‘भारताचा अभ्यास कमी पडला’

भारताच्या पराभवाचे कारण सांगताना स्वान म्हणाले,”भारत सामन्यात पराभूत होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची पूर्ण तयारी झाली नव्हती. सामन्याची, मैदानाची आणि प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पूर्ण अभ्यास भारतीय संघ करु शकला नसल्याने हा पराभव झाला.”

हे ही वाचा :

WTC Final ची ट्रॉफी जिंकल्यानंतर केन विल्यमसनचं खास ठिकाणी फोटोशूट, आयसीसीने पोस्ट केले फोटो

WTC Final मध्ये का पराभूत झाला भारतीय संघ?, सचिन तेंडुलकरने सांगितलं कुठे चूकला विराट कोहली

WTC स्पर्धेत अश्विनचा डंका, सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड, कांगारु बोलरला पछाडलं!

(England Cricket legend Graeme Swann Supports Virat Kohli Captaincy eveb After Lost In WTC Final Against New Zealand)

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.