72 षटकार ठोकत इंग्लंडच्या फलंदाजाने रचला इतिहास, मोठमोठ्या दिग्गजांनाही टाकलं मागे

क्रिकेटमध्ये अनेक फलंदाज मिळूनही करु न शकलेली कामगिरी एका फलंदाजाने एकट्याच्या जीवावर केली आहे. इंग्लंडच्या या फलदाजाने षटकार ठोकण्यात अनोखी कामगिरी केली आहे.

72 षटकार ठोकत इंग्लंडच्या फलंदाजाने रचला इतिहास, मोठमोठ्या दिग्गजांनाही टाकलं मागे
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 10:49 AM

लंडन : क्रिकेटमध्ये षटकार ठोकण्याचा विषय निघाला की, तुम्हाला वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, आंद्रे रस्सेल आठवेल.दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्ससह ऑस्‍ट्रेलियाचे डेव्हिड वॉर्नर किंवा ग्‍लेन मॅक्‍सवेल यांचेही नाव डोक्यात येते. भारताचा विचार करता  वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग किंवा रोहिचत शर्मा या दिग्गजांचा विचार मनात येतो. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा फलंदाजाबद्दल सांगणार आहे, ज्याने षटकारांचा पाऊस पाडत अनेक दिग्गजांना मागे टाकले. आजच्याच दिवशी म्हणजे 24 ऑगस्ट रोजी त्याने एका षटकात 5 षटकारही ठोकले होते.

तर आम्ही सांगत असलेला फलंदाज हा इंग्‍लंड संघाचा (England Cricket Team) असून त्याचे नाव आहे ऑर्थर वेल्‍लार्ड (Arthur Wellard). काउंटी क्रिकेटमधील संघ समरसेटसाठी (Somerset)  जबरदस्‍त प्रदर्शन करणारा ऑर्थर  इंग्‍लंड संघासाठी केवळ दोनच कसोटी सामने खेळला आहे. वेल्‍लार्डने 1938 साली आजच्याच दिवशी केंट संघाचा अष्टरपैलू खेळाडू फ्रँक वूलीच्या एका षटकात पाच षटकार लगावले होते. गॅरी सोबर्सने 1968 मध्ये मॅल्‍कम नॅशच्या एका षटकात सहा षटकार ठोकण्यापूर्वी हाच सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड होता. विशेष म्हणजे ऑर्थर याने एका सीजनमध्ये 72 षटकार लगावले होते. त्यानंतर 1985 मध्ये इयान बॉथमने एक सीजनमध्ये 80 षटकार लगावत हा रेकॉर्ड तोडला असला तरी वेल्‍लार्ड हा एक गोलंदाज असून त्याने ही उत्कृष्ट कामगिरी केली होती.

कारकिर्दीत ठोकले 500 हून अधिक षटकार

ऑर्थर वेल्‍लार्डने षटकारांचे अनेक रेकॉर्ड केले होते. यामध्ये सर्वात आधी एका षटकात पाच षटकार, तसेच तीन वेळा सीजनमध्ये  50 हून अधिक षटकार ठोकण्याची कामगिरी त्याने केली होती.  प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 500 हून अधिक षटकार लगावणारा ऑर्थर इंग्‍लंड संघाकडून दोन कसोटी सामने खेळला आहे. यात चार डावात त्याने 11.75  च्या सरासरीने 47 धावा केल्या. यामध्ये 38 हा  सर्वाधिक स्‍कोर आहे. तसेच या दोन सामन्यात सात विकेटही त्याने घेतल्या.  प्रथम श्रेणी सामन्यांचा विचार करता त्याने 417 सामन्यातील 679 डावांत 46 वेळा नाबाद राहत 19.72 सरासरीने 12 हजार 485 धावा केल्या. यामध्ये दोन शतकांसह 59 अर्धशतकांचा समावेश आहे. 500 हून अधिक षटकार ऑर्थरने ठोकले असून गोलंदाजीतही चांगले प्रदर्शन केले आहे. याच 417 प्रथम श्रेणी सामन्या त्याने 1 हजार 614 फलंदाजाना तंबूत धाडले आहे.

हे ही वाचा

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात ‘ही’ आहे भारताची खरी ताकद, इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटपटूकडून कौतुक

IND vs ENG : तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा विजय पक्का, इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने सांगितली 5 महत्त्वाची कारणं

(England Cricketer and somerset batsman arthur wellard hit manysixes in a season on this day marathi)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.