IND vs ENG : भारतीय संघासाठी ‘बॅड न्यूज’, भेदक गोलंदाज आणि विश्वासू फलंदाज असणारा खेळाडू चौथ्या कसोटीत इंग्लंडकडून मैदानात
इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी मालिका 1-1 असा बरोबरीत आली आहे. आता चौथी कसोटी दोन्ही संघासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे दोन्ही संघ अंतिम 11 खेळाडू निवडण्यात व्यस्त आहेत.
लंडन: भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथी कसोटी गुरुवारपासून (2 सप्टेंबर) ओवलच्या मैदानावर (Oval Test) खेळवली जाणार आहे. दोन्ही संघ मालिकेत 1-1 च्या बरोबरीत असल्याने चौथी कसोटी महत्त्वाची असेल. या महत्त्वाच्या कसोटीपूर्वीच भारतीय संघाच्या चिंतेत मात्र वाढ झाली आहे. इंग्लंडच्या संघात स्टार अष्टपैलू खेळाडू ख्रिस वॉक्स (Chris Woakes) याचा समावेश झाल्याने भारतीय संघाची डोकेदुखी वाढणार आहे.
काही दिवसांपूर्वी ख्रिस दुखापतीतून सावरला होता त्यानंतर आता इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक क्रिस सिल्वरवुड (Chris Silverwood) यांनी रविवारी दिलेल्या माहितीत, ख्रिस सर्व फिटनेस टेस्टमध्ये पास झाला आहे. त्यामुळे चौैथ्या कसोटीत तो भारताविरुद्ध मैदानात उतरणार असल्याचे सांगितले. नुकताच ख्रिस 23 ऑगस्ट रोजी वारविकशरच्या सेकेंड इलेवनमधून सामनाही खेळला होता. ज्यात त्याने 34 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. त्यामुळे तो खेळासाठी तयार झाला असून भारतासाठी मोठा धोका ठरणार हे नक्की
दुखापतीतून सावरला ख्रिस
क्रिस वोक्स हा पायाच्या दुखापतीमुळे इंग्लंड संघातून बाहेर होता. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याला ही दुखापत झाली होती. तेव्हापासून तो उपचार आणि सराव घेत ठीक होण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर आता दुखापतीतून सावरत त्याने संघात पुनरागमन केले आहे.
भारताविरुद्ध हीट आहे ख्रिस वॉक्स
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत ख्रिस खेळणार की नाही याबाबत अजून कोणती नेमकी माहिती आलेली नाही. मात्र ख्रिसची भारताविरुद्धची कामगिरी उत्कृष्ट आहे. 2018 मध्येही त्याने भारताविरुद्ध उत्तम प्रदर्शन केलं होतं. त्याने दोन कसोटी सामन्यात 8 विकेट्स घेतल्या होत्या. या मालिकेत इंग्लंडने भारताला 4-1 ने पराभूत केले होते. त्यामुळे आता 1-0 ने कसोटी मालिकेत पिछाडीवर असणारा इंग्लंडचा संघ ख्रिसला खेळवणार का? हे पाहावे लागेल.
हे ही वाचा :
IND vs ENG : चौथ्या कसोटी सामन्यात सूर्यकुमारला जागा नाही, माजी क्रिकेटपटूने सांगितले कारण
तिसऱ्या कसोटीत पराभूत होणारी टीम इंडिया ‘युजलेस’; मायकल वॉनचा विराटसेनेवर वार
(England cricketer Chris woakes will play against india at 4th test at oval says coach chris silverwood)