जोस बटलरच्या घरी अवतरली परी, राजस्थान रॉयल्सने दिल्या खास शुभेच्छा, फोटोही केला शेअर

इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज आणि आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा महत्त्वाचा खेळाडू जॉस बटलर यांना नुकतंच कन्यारत्न झालं आहे.

जोस बटलरच्या घरी अवतरली परी, राजस्थान रॉयल्सने दिल्या खास शुभेच्छा, फोटोही केला शेअर
जोस बटलर
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 6:02 PM

लंडन: इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर (Jos Butler) दुसऱ्यांदा बाबा झाला आहे.  त्याच्या पत्नीने रविवारी पाच सप्टेंबर रोजी एका मुलीला जन्म दिला. 2019 मध्ये बटलर पहिल्यांदा वडिल झाला होता. त्यावेळीही त्याला मुलगीच झाली होती. तिचं नाव जॉर्जिया ठेवलं होतं. दरम्यान आता दुसऱ्यांदा पत्नीला मुलं होणार असताना तिच्यासोबत राहण्यासाठी बटलरने भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेली कसोटी मालिका मध्येच सोडली. तसेच आयपीएलच्या (IPL 2021) उर्वरीत सामन्यांतूनही माघार घेतली आहे.

बटलर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या संघाकडून खेळतो. त्यामुळे राजस्थान संघानेही बटलरला वडिल होण्याच्या शुभेच्छा देत त्याचा आणि मुलीचा फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसंच या फोटोच्या कॅप्शनमध्ये मुलीचं नाव लिहीत, ‘जॉसला मुलगी झाली आहे. रॉयल्स कुटुंबात स्वागत आहे मॅगी’ असंही लिहिलं आहे.

टी20 विश्वचषकात करणार पुनरागमन

पत्नीला मुलं होणार असल्याने तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी बटलरने भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसह यंदाच्या आयपीएलमधूनही माघार घेतली आहे. त्यामुळे तो आता थेट ऑक्टोबर महिन्यात युएई आणि ओमान देशात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात खेळताना दिसणार आहे. बटलरने  यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत सात सामन्यात एका शतकासह 254 धावा केल्या. तर भारत दौऱ्यात पहिल्या तीन कसोटीतील पाच डावात 0,17,23, 25, 7 अशा धावसंख्येवर बाद झाला आहे.

इतर बातम्या

रोहितंच अप्रतिम शतक, रितीकाची Flying Kiss, VIDEO पाहून चाहतेही घायाळ

मॅचनंतर दादा ही कामं करायला सांगायचा, केबीसीच्या सेटवर सेहवाग-गांगुलीचा कलगीतुरा, बिग बी बघतच राहिले!

तो परत आला… भारताच्या गोलंदाजीवेळी Jarvo 69 मैदानात, इंग्लंडच्या फलंदाजाला दिला धक्का!

(England cricketer jos butler becomes father of baby girl Rajsthan royals wished him)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.