Andrew Flintoff Accident: फ्लिनटॉफच्या कारला भीषण अपघात, एअरलिफ्ट करुन नेल हॉस्पिटलमध्ये
Andrew Flintoff Accident: कधी, कुठे झाला अपघात?
लंडन: इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्रयू फ्लिनटॉफच्या कारचा भीषण अपघात झाला. त्याला एअरलिफ्टद्वारे रुग्णालयात पोहोचवण्यात आलं. सरेमध्ये फ्लिनटॉफ BBC सीरीजच्या एपिसोडच शूटिंग करत होता, त्यावेळी हा अपघात झाला. 45 वर्षाच्या अँड्रयू फ्लिनटॉफला तडकाफडकी रुग्णालयात नेण्यात आलं. सुदैवाने त्याच्या प्रकृतीला कोणताही धोका नाहीय.
अपघाताच्यावेळी कारचा वेग किती होता?
सोमवारी सकाळी फ्लिनटॉफच्या कारचा अपघात झाला. या अपघातात त्याला दुखापत झालीय. सेटवरील मेडिकल टीमने तात्काळ त्याच्यावर उपचार केले. त्यांच्या सल्ल्यावरुन पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. अपघाताच्यावेळी फ्लिनटॉफच्या कारचा वेग नॉर्मल होता. त्याच्या जीवाला कुठलाही धोका नाहीय.
हाय-स्पीडमुळे याआधी झालाय अपघात
फ्लिनटॉफच्या कारला पहिल्यांदा अपघात झालेला नाही. याआधी 2019 साली टॉप गीयरच्या एका दुसऱ्या एपिसोड शूटिंग दरम्यान दुर्घटना झाली होती. वेगामुळे त्याचं स्टेअररिंगवरील नियंत्रण सुटलं होतं. त्यावेळी 124mph वेगामध्ये गाडी चालवत होता.
2009 साली क्रिकेटच्या पीचवरुन निवृत्ती
अँड्रयू फ्लिनटॉफ इंग्लंडसाठी 79 टेस्ट आणि 141 वनडे सामने खेळलाय. त्याने 2009 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन निवृत्ती घेतली. 2005 साली Ashes सीरीजमध्ये तो मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता.
गळा कापण्याची धमकी दिली
2007 साली पहिल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगला चिथावणी देण्यासाठी आजही फ्लिनटॉफची आठवण काढली जाते. फ्लिनटॉपने त्यावेळी गळा कापण्याची आपल्याला धमकी दिली होती, असं युवीने एका मुलाखतीत सांगितलं. त्यानंतर युवीने जे केलं, ते आजही क्रिकेट रसिकांच्या लक्षात आहे. स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच ओव्हरमध्ये युवीने 6 सिक्स मारले होते.