T20 World Cup 2021: इंग्लंडला सेमीफायनलमध्ये तर एन्ट्री मिळाली, पण महत्त्वाचा गोलंदाज स्पर्धेबाहेर
नुकतंच श्रीलंका संघाला नमवत इंग्लंडने ग्रुप 1 मध्ये सलग चौथा विजय मिळवला. या विजयासह त्यांची सेमीफायनलमधील जागा निश्चित झाली आहे. पण याचदरम्यान त्यांचा महत्त्वाचा गोलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे.
T20 Cricket World Cup 2021: इंग्लंड क्रिकेट संघाने टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) सोमवारी श्रीलंका संघाला मात देत स्पर्धेतील सलग चौथा विजय मिळवला. इंग्लंडने श्रीलंका संघाला 26 धावांनी मात देत हा विजय मिळवला. त्यामुळे ग्रुप 1 मध्ये सर्वाधिक विजय मिळवत सेमीफायनलमध्ये एन्ट्रीही त्यांनी मिळवली. पण याच सामन्यात त्यांचा महत्त्वाचा गोलंदाज टायमल मिल्स (Tymal Mills) दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर गेला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) याबद्दलची माहिती दिली.
मिल्सला श्रीलंकेविरुद्ध सामना खेळत असताना सामन्यादरम्यानचं दुखापत झाली. तो दुसरी ओव्हर टाकत असताना तिसऱ्या चेंडूवेळी दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो सामन्यात 1.3 ओव्हरचं बोलिंग करु शकला. त्यानंतर त्याच्या दुखापतीचे स्कॅन ककरण्यात आले. मंगळवारी रात्री ही दुखापत गंभीर असल्याचं समजलं, ज्यामुळे त्याला संपूर्ण स्पर्धेतून विश्रांतीसाठी बाहेर पडावं लागणार आहे. त्याने या स्पर्धेत 4 सामन्यात 4 विकेट्स घेतल्या आहेत.
View this post on Instagram
श्रीलंकेला नमवत इंग्लंज सेमीफायनलमध्ये
श्रीलंका आणि इंग्लंड या सामन्यात नाणेफेक जिंकत श्रीलंकेने सर्व संघ करत असल्यालप्रमाणे प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडला कमी धावात बाद करुन नंतर टार्गेट पूर्ण करु असा विचार श्रीलंका संघाने केला. पण या स्वप्नाच्या मध्ये जोस बटलर आला. त्याने 67 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकार ठोकत नाबाद 101 धावा केल्या. कर्णधार मॉर्गनने 40 धावांची साथ दिल्यामुळे इंग्लंडने स्कोरबोर्डवर 163 धावा लावल्या.
164 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंका संघाची सुरुवातच खराब झाली. सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. असलंकाने 21, कर्णधार शनाका आणि भानुपक्षा यांनी प्रत्येकी 26 धावा केल्या. तर सर्वाधिक वानिंदू हसरंगाने 34 धावा कुटल्या. पण तोही बाद झाल्यानंतर पुढील फलंदाज लक्ष्यापर्यंत पोहचू शकले नाहीत, 137 धावांवर संघ सर्वबाद झाल्यामुळे श्रीलंका 26 धावांनी पराभूत झाली. ज्यामुळे इंग्लंड विजयासह पुढील फेरीत पोहचली आहे.
हे ही वाचा :
T20 World Cup 2021: येणारा रविवार ठरवणार टीम इंडियाचं भविष्य, भारत सेमीफायनल खेळणार का?
मोठी बातमी: राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा हेड कोच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची माहिती
(England fast bowler tymal mills ruled out of world cup due to injury)