IND vs ENG: इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स भारताविरुद्धच्या कसोटी सामन्याला मुकणार?
IND vs ENG: भारतीय चमूत (Indain camp) सर्व काही ठीक ठाक सुरु आहे. पण इंग्लंडच्या कॅम्पमधून चांगली बातमी नाहीय. भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्याआधी इंग्लंडचा संघ आजाराने त्रस्त आहे.
मुंबई: टीम इंडिया (Team India) इंग्लंडमध्ये दाखल झाली असून त्यांनी तिथे सराव सुरु केला आहे. त्यांनी तिथल्या वातावरणाशीही जुळवून घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. भारतीय चमूत (Indain camp) सर्व काही ठीक ठाक सुरु आहे. पण इंग्लंडच्या कॅम्पमधून चांगली बातमी नाहीय. भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्याआधी इंग्लंडचा संघ आजाराने त्रस्त आहे. टीमचे बॅटिंग कोच मार्कस ट्रेस्कोथिक त्या आजाराच्या विळख्यात आले आहेत. टीमचा कॅप्टन बेन स्टोक्सची (Ben stokes) हालतही खराब असल्याची माहिती आहे. ट्रेस्कोथिक यांना झालेला आजारच स्टोक्सला झालाय का? ते अजून स्पष्ट नाहीय. बेन स्टोक्सच सध्या न्यूझीलंड विरुद्ध हेडिंग्ले कसोटीत खेळणं आणि त्यानंतर भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळण्याबद्दल सस्पेन्स कायम आहे.
बेन स्टोक्स सरावामध्ये सहभागी झाला नव्हता
इंग्लंडचे बॅटिंग कोच मार्कस ट्रेस्कोथिक यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यापासून ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. ते संघासोबत लीड्सला गेलेले नाहीत. घरीच डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. इंग्लंडचा संघ भारताविरुद्ध एकमेव कसोटी खेळण्याआधी 23 जून पासून न्यूझीलंड विरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळणार आहे. लीडस मध्ये होणाऱ्या कसोटी सामन्याआधी इंग्लिश संघाने जोरदार सराव केला. पण बेन स्टोक्स सरावामध्ये सहभागी झाला नव्हता.
इंग्लंड 2-0 ने आघाडीवर
इंग्लिश मीडिया रिपोर्ट्सच्या वृत्तानुसार, हेडिंग्ले कसोटीत उतरण्याआधी बेन स्टोक्सला फिटनेस टेस्ट द्यावी लागेल. फिटनेस टेस्ट पास केली, तरच न्यूझीलंडविरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळता येईल. बेन स्टोक्सला मार्कस ट्रेस्कोथिक प्रमाणे कोरोना झालाय की, नाही ते अजून स्पष्ट नाहीय. न्यूझीलंड विरुद्ध 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड 2-0 ने आघाडीवर आहे.