IND vs ENG : इंग्लंड संघावर संकट, शेवटच्या कसोटीसाठी दिग्गज खेळाडू हुकणार

इंग्लंडचा हा दिग्गज खेळाडू भारताविरुद्धच्या शेवटच्या कसोटीसह आयपीएल आणि ऐतिहासिक एशेस सिरीजलाही हुकण्याची चिन्ह दिसून येता आहे.

IND vs ENG : इंग्लंड संघावर संकट, शेवटच्या कसोटीसाठी दिग्गज खेळाडू हुकणार
इंग्लंड क्रिकेट संघ
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 4:36 PM

लंडन : इंग्लंड संघासाठी ऐतिहासिक आणि मानाची अशी एशेज सीरीज (Ashes Series) सुरु होण्याआधीच इंग्लंड संघाला मोठा झटका बसला आहे. संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर (Jos Butler) या मालिकेसाठी बाहेर होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. शनिवारी समोर आलेल्या बातमीनुसार बटलर त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी  19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या (IPL 14) उर्वरीत सामन्यांनाही मुकणार आहे. तसेच भारताविरुद्धची शेवटची कसोटीही बटलर खेळताना दिसणार नाही. कोरोनाच्या संकटामुळे कुटुंबाला ऑस्ट्रेलियात घेऊन जाता येणार नसल्याने यावर्षीच्या अंतिम महिन्यांत होणाऱ्या एशेज मालिकेसाठीही बटलर मुकणार आहे.

इंग्लंडच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा आणि अंतिम कसोटी सामना 10 ते 14 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. पण कसोटीच्या पहिल्याच दिवशी बटलरच्या पत्नीला मुलं होण्याची अंदाजे तारीख डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे तो पत्नी लुईस आणि दो वर्षाची मुलगी जॉर्जिया यांच्यासोबत राहण्यासाठी सामन्याला मुकणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. 2019 मध्येही बटलर मुलगी जॉर्जियाच्या जन्मासाठी आयपीएलचे पर्व मध्येच सोडून परतला होता.

काय म्हणाला बटलर?

बटलरने रविवारी टाइम्सला दिलेल्या माहितीत सांगितले की,“मुलं होण ही माझ्यासह पत्नीसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी काही काळ क्रिकेटला बाजूला ठेवायला लागले तरी हरकत नाही.” तसंच पुढे बोलताना तो म्हणाला,“कोरोनाचं महामारी सर्वांसाठी एक मोठं संकट आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्येही खूप नियम आहेत. त्यात बाहेरील देशांतील खेळाडूंसाठी बायोबबलचे नियम खूप कडक असतात. देशांतर्गत म्हणजेच इंग्लंडमध्ये खेळणं ही एखाद्या दौऱ्यासारखं आहे. त्यामुळे कुटुंबाला वेळ देण्यासाठी या महत्त्वाच्या स्पर्धांमधूनही माघार घेतली आहे.”

हे ही वाचा

राहुल द्रविडचा भारतीय संघात ‘या’ पदासाठी अर्ज, द्रविडच्या निर्णयाचे पाकिस्तानपासून ऑस्ट्रेलियापर्यंत स्वागत

इंग्लंडच्या मैदानात ‘या’ गोलंदाजाची अफलातून कमाल, सात हॅट्रीक घेत रचला इतिहास

PHOTO : ‘सिराज तू तर जगात भारी’, पाकिस्तानची पत्रकार झाली मोहम्मद सिराजची फॅन

(England Player jos buttler might skip ashes series and last test against india)

Non Stop LIVE Update
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा.
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी.
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा.
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली.
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार.
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.