T20 World Cup: पाकिस्तानला हरवून इंग्लंड वर्ल्ड चॅम्पियन, ‘या’ पाच खेळाडूंच्या बळावर जिंकला वर्ल्ड कप
T20 World Cup: इंग्लंडच्या विजयाचे 'ते' पाच हिरो कोण?
मेलबर्न: T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानला हरवलं. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने फक्त 137 धावा केल्या. इंग्लंडच्या टीमने 6 चेंडू आणि पाच विकेट राखून विजय मिळवला. टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये बेन स्टोक्सने नाबाद 52 धावा फटकावल्या. त्याने विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याआधी सॅम करनने 4 ओव्हर्समध्ये 12 धावा देऊन 3 विकेट काढल्या. या टुर्नामेंटमध्ये इंग्लंडच्या विजयाचे 5 हिरो होते. या पाच प्लेयर्सनी चेंडू आणि बॅटची कमाल दाखवून दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला.
1 – विजयाचा पहिला हिरो सॅम करन आहे. त्याने 6 मॅचेसमध्ये 13 विकेट काढल्या. त्याचा इकॉनमी रेट फक्त 6.52 चा आहे. करनने अफगाणिस्तान विरुद्ध 10 धावा देऊन 5 विकेट काढल्या. हे त्याच बेस्ट प्रदर्शन होतं. करन मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
2 – इंग्लंडच्या विजयाचा दुसरा हिरो कॅप्टन जोस बटलर आहे. त्याने टीमसाठी सर्वाधिक धावा केल्या. बटलरने 45 च्या सरासरीने 225 धावा केल्या. बटलरचा स्ट्राइक रेट 144 पेक्षा जास्त होता. कॅप्टनशिप करताना त्याने कुशल नेतृत्व केलं.
3 – एलेक्स हेल्स टीमच्या विजयाचा तिसरा हिरो आहे. त्याने या वर्ल्ड कपमध्ये 42 पेक्षा जास्त सरासरीने 212 धावा फटकावल्या. त्याचा स्ट्राइक रेट 147 पेक्षा पण जास्त होता.
4 – बेन स्टोक्स या विजयाचा चौथा हिरो आहे. त्याने संपूर्ण टी 20 वर्ल्ड कपमध्ये सरासरी प्रदर्शन केलं. पण फायनलमध्ये त्याने टॉप खेळ दाखवला. स्टोक्सने 36 पेक्षा जास्त सरासरीने 110 धावा केल्या. त्याने 6 विकेट काढले.
5 – मार्क वुड इंग्लंडच्या विजयाचा पाचवा हिरो आहे. त्याने आपल्या वेगाने टी 20 वर्ल्ड कपमध्ये एक नवीन रेकॉर्ड केला. मार्क वुडने 30 पेक्षा जास्तवेळा 150 किमी प्रति तास वेगाने चेंडू टाकला. या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक वेगाने गोलंदाजी करणारा तो बॉलर आहे. मार्क वुड दुखापतीमुळे सेमीफायनल आणि फायनलमध्ये खेळू शकला नाही. मार्क वुडने 4 मॅचेसमध्ये 9 विकेट घेतल्या.