4 तासात 27 विकेट, दीड दिवसात कसोटी सामना संपला, लॉर्ड्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी ठरली कर्दनकाळ
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या Ashes सीरीजच (England vs Australia Ashes Test) एक वेगळं महत्त्व आहे. या सीरीजने क्रिकेटला अनेक संस्मरणीय, शानदार, रोमांचक आणि आश्चर्याचा धक्का देणारे क्षण दिले आहेत.
मुंबई: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या Ashes सीरीजच (England vs Australia Ashes Test) एक वेगळं महत्त्व आहे. या सीरीजने क्रिकेटला अनेक संस्मरणीय, शानदार, रोमांचक आणि आश्चर्याचा धक्का देणारे क्षण दिले आहेत. Ashes सीरीज ही कसोटी क्रिकेटमधील मोठी लढाई मानली जाते. लॉर्ड्स आणि मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानावर झालेल्या सामन्यांनी Ashes सीरीजच महत्त्व आणखी वाढवलं. अनेक रोमांचक सामने या स्टेडियमवर खेळले गेले. असाच एक सामना आजपासून 134 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी लॉर्ड्सच्या मैदानावर (Lord’s Cricket Ground) खेळला गेला होता. या दिवशी फलंदाजांसाठी खेळपट्टीवर टिकणं खूपच मुश्किल होतं.
पावसामुळे खेळपट्टी बनली धोकादायक
1888 ची ही गोष्ट आहे. लॉर्ड्सवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मध्ये पहिला सामना खेळला गेला. हा सामना 16 जुलैला सुरु झाला होता. त्यादिवशी मैदानावर खूपच नाट्यपूर्ण घडामोडी पहायला मिळाल्या. खरा खेळ तर दुसऱ्यादिवशी 17 जुलैला झाला. या कसोटी दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला होता. त्यामुळे पहिल्यादिवशी जास्त खेळ होऊ शकला नव्हता. त्यावेळी पाऊस आल्यास खेळपट्टी झाकण्यााची पद्धत नव्हती. सहाजिकच त्यामुळे खेळपट्टी खराब होणं, स्वाभाविक होतं.
पहिल्यादिवशी तमाशा, दुसऱ्यादिवशी कहर
मॅचच्या पहिल्यादिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 116 धावात आटोपला. इंग्लंडने सुद्धा 18 धावांपर्यंत 3 विकेट गमावल्या होत्या. एकूण मिळून पहिल्यादिवशी 13 विकेट पडल्या. मॅचच्या दुसऱ्यादिवशी तर गोलंदाज कर्दनकाळ ठरले. फलंदाजांमध्ये जणू आल्यापावली पॅव्हेलियन मध्ये परतण्याची स्पर्धा लागली होती. मॅच संपायला चार तासांपेक्षा फक्त थोडा जास्त वेळ लागला. इंग्लंडने पहिल्या डावात आपले उर्वरित 7 विकेट फक्त 35 धावात गमावले. इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 53 धावात आटोपला.
ऑस्ट्रेलियाकडे 63 धावांची आघाडी होती. त्यांचा दुसरा डाव फार वेळ चालला नाही. जॉर्ज लोहमन आणि बॉबी पील यांनी 4-4 विकेट गमावून ऑस्ट्रेलियाचा खेळ 60 धावात संपवला.
4-5 तासात मॅचच संपली
इंग्लंडला विजयासाठी 124 धावांची आवश्यकता होती. त्यांच्याकडे पुढचे 2 ते 3 दिवस होते. पण दोन-तीन दिवस लांब राहिले. संपूर्ण टीम पुन्हा एकदा अवघ्या 2 तासात ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियाच्या चार्ली टर्नर आणि जेजे फेरिसने 5-5 विकेट काढले व इंग्लंडचा डाव 62 धावात आटोपला. म्हणजे दुसऱ्याडावात ऑस्ट्रेलियाने एक रन्सही बनवला नसता, तरीही इंग्लिश संघ 1 रन्सने हरलाच असता. अशा प्रकार पाच तासांच्या आत 27 विकेट पडल्या. दीड दिवसाच्या आताच कसोटी सामना संपला. या सामन्यात एकूण 40 विकेट पडले. त्यात 9 फलंदाज खातही उघडू शकले नाहीत. टर्नरने 10 आणि फेरिसने 8 विकेट काढल्या.