England vs New Zealand T20 World Cup: न्यूझीलंडचा इंग्लंडवर रोमहर्षक विजय, 5 विकेट्सने सामना जिंकत मिळवली फायनलमध्ये एन्ट्री

| Updated on: Nov 10, 2021 | 11:20 PM

England vs New Zealand T20 world cup: पहिल्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला मात देत अंतिम सामन्यात जागा मिळवली आहे.

England vs New Zealand T20 World Cup: न्यूझीलंडचा इंग्लंडवर रोमहर्षक विजय, 5 विकेट्सने सामना जिंकत मिळवली फायनलमध्ये एन्ट्री
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड

यंदाचा टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सेमीफायनलच्या सामन्यांना सुरुवात झाली असून आज पहिल्या लढतीत ग्रुप 1 मधून आलेल्या इंग्लंडला ग्रुप 2 मधून आलेल्या न्यूझीलंडने मात देत अंतिम सामन्यात एन्ट्री मिळवली आहे. दोन्ही संघाचं यंदाच्या स्पर्धेतील प्रदर्शन तसं उत्तम आहे. त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होणार होता. त्याप्रमाणे झालाच पण अखेरच्या काही षटकात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दमदार फटकेबाजी केली. डॅरेल मिचेलच्या नाबाद 72 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने सामना 5 विकेट्सने जिंकला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Nov 2021 11:04 PM (IST)

    ENG vs NZ: न्यूझीलंडचा इंग्लंडवर विजय

    दमदार फटकेबाजी करुन जेम्स निशाम बाद झाला. पण डॅरेल मिचेलच्या नाबाद 72 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने सामना 5 विकेट्सने जिंकला आहे.

  • 10 Nov 2021 10:57 PM (IST)

    ENG vs NZ: जेम्स निशामची फटकेबाजी सुरु

    जेम्स निशामने अडचणीच्या काळात संघाला सावरत फटकेबाजी सुरु केली आहे. त्याने 9 चेंडूत 26 धावा ठोकल्या आहेत.

  • 10 Nov 2021 10:40 PM (IST)

    ENG vs NZ: ग्लेन फिलीप्स बाद

    इंग्लंडचा चौथा गडी तंबूत परतला आहे. ग्लेन फिलिप्स 2 धावा करुन लियाम लिव्हिंगस्टोनच्या चेंडूवर बाद झाला आहे.

  • 10 Nov 2021 10:33 PM (IST)

    ENG vs NZ: कॉन्वेचं अर्धशतक हुकलं

    न्यूझीलंडचा डाव सांभाळणारा डेवोन कॉन्वे 46 धावांवर बाद झाला आहे. लियाम लिव्हिंगस्टोनने त्याची विकेट घेतली आहे.

  • 10 Nov 2021 10:02 PM (IST)

    ENG vs NZ: कॉन्वे-मिचेलने सांभाळला डाव

    दोन महत्त्वाचे गडी बाद झाल्यानंतर सध्या न्यूझीलंडची धुरा डेवॉन कॉन्वे आणि डॅरिल मिचेलने सांभाळली आहे. 8 षटकानंतर न्यूझीलंडचा स्कोर 45 आहे.

  • 10 Nov 2021 09:38 PM (IST)

    ENG vs NZ: केन विल्यमसन बाद

    न्यूझीलंडचा सलामीवीर गप्टील बाद झालाच आहे. पण त्यापाठोपाठ फलंदाजीचा कणा असणारा कर्णधार केन विल्यमसनही 5 धावा करुन बाद झाला आहे. ख्रिस वोक्सच्या चेंडूवर आदील राशिदने त्याचा झेल घेतला आहे.

  • 10 Nov 2021 09:32 PM (IST)

    ENG vs NZ: न्यूझीलंडची खराब सुरुवात

    167 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात खराब झाली आहे. त्यांचा सलामीवीर मार्टीन गप्टील 4 धावा करुन बाद झाला आहे.

  • 10 Nov 2021 09:12 PM (IST)

    ENG vs NZ: इंग्लंडची 166 धावांपर्यंत मजल

    मोईन अली (नाबाद 52) आणि डेविड मलान (42) यांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने 166 धावांपर्यंत मजल मारली आहे.

  • 10 Nov 2021 09:09 PM (IST)

    ENG vs NZ: मोईन अलीचं अर्धशतक

    महत्त्वाच्या सामन्यात अनुभवी मोईन अलीने अर्धशतक ठोकत एक उत्तम खेळी खेळला आहे. त्याने 36 चेंडूत 3 चौकार  आणि 2 षटकारांसह अर्धशतक पूर्ण केलं आहे.

  • 10 Nov 2021 08:57 PM (IST)

    ENG vs NZ: मोईन अलीची फटकेबाजी सुरु

    डेविड मलान बाद होताच मोईन अलीने फटेकबाजी सुरु केली आहे. त्याने दोन षटकार ठोकत 40 धावांचा आकडा पार केला आहे.

  • 10 Nov 2021 08:51 PM (IST)

    ENG vs NZ: डेविड मलान बाद

    इंग्लंडकडून उत्तम फलंदाजी करणारा डेविड मलान बाद झाला आहे. 42 धावांवर मलान तंबूत परतला आहे. साऊदीच्या चेंडूवर कॉन्वेने त्याचा झेल घेतला आहे.

  • 10 Nov 2021 08:42 PM (IST)

    ENG vs NZ: इंग्लंडच्या 100 धावा पूर्ण

    डेविड मलान आणि मोईन अलीने इंग्लंडचा डाव सावरला असून इंग्लंडच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. 14 ओव्हरनंतर इंग्लंडचा स्कोर 100 असून मलान 34 तर अली 17 धावांवर खेळत आहे.

  • 10 Nov 2021 08:30 PM (IST)

    ENG vs NZ: मलानची फटकेबाजी सुरु

    इंग्लंडचा फलंदाज डेविड मलान उत्तम फटकेबाजी करताना दिसत आहे. तो उत्कृष्ट चौकार लगावत असून आतापर्यंत त्याने 4 चौकार लगावले आहेत. 28 धावांवर तो खेळत आहे.

  • 10 Nov 2021 08:22 PM (IST)

    ENG vs NZ: 10 षटकानंतर इंग्लंडचा स्कोर 67

    10 षटकांटा डाव झाला असून इंग्लंडने 67 धावापर्यंत मजल मारली आहे. सलामीवीर बेयरस्टो आणि बटलर तंबूत परतले असून सध्या मोईन आणि डेविड खेळत आहेत.

  • 10 Nov 2021 08:12 PM (IST)

    ENG vs NZ: जोस बटलर बाद

    इंग्लंडला मोठा झटका बसला असून 50 धावा पूर्ण होताच, त्यांचा महत्त्वाचा खेळाडू असणारा जोस बटलर तंबूत परतला आहे. इश सोढीने त्याला पायचीत केलं आहे.

  • 10 Nov 2021 07:59 PM (IST)

    ENG vs NZ: बेयरस्टो तंबूत परत

    इंग्लंड संघाचा पहिला गडी बाद झाला आहे. अॅडम मिल्ने यांच्या चेंडूवर कर्णधार केन विल्यमसनने जॉनी बेयरस्टो याचा झेल पकडला आहे.

  • 10 Nov 2021 07:50 PM (IST)

    ENG vs NZ: बेयरस्टो-बटलर जोडीची विश्वासू सुरुवात

    सलामीला आलेल्या बेयरस्टो आणि बटलर जोडीने चांगली सुरुवात केली आहे. 4 षटकानंतर इंग्लंडचा स्कोर 29 धावा आहे.

  • 10 Nov 2021 07:37 PM (IST)

    ENG vs NZ: आजच्या सामन्याबद्दल पुजाराचं मत काय?

    भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने आजच्या सामन्याबद्दलचं त्याचं मत एका व्हिडीओद्वारे शेअर केलं आहे.

    Koo App

    The semi-finals begin today, and here are my players to watch out for from each of the four teams!

    Who do you think will make the biggest impact?

    #t20worldcup #EngVsNZ #PakVsAus #sabsebadastadium

    Cheteshwar Pujara (@cheteshwarpujara) 10 Nov 2021

  • 10 Nov 2021 07:33 PM (IST)

    ENG vs NZ: इंग्लंडचे सलामीवीर मैदानात

    न्यूझीलंडने गोलंदाजी निवडल्यामुळे इंग्लंडचे खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात आले आहेत. जॉनी बेयरस्टोसोबत जॉस बटलर फलंदाजी करत आहे.

  • 10 Nov 2021 07:14 PM (IST)

    आतापर्यंत इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड

    इंग्लंड आणि न्यूझीलंडचा संघ आतापर्यंत बऱ्याचदा टी20 सामने खेळला आहे. दोघांनी 21 टी20 सामने खेळले असून इंग्लंडचं पारडं जड आहे. यावेळी इंग्लंडने 13 वेळा तर न्यूझीलंडने 7 वेळा विजय मिळवला आहे. आतापर्यंत एक सामना अनिर्णीत सुटला आहे.

  • 10 Nov 2021 07:11 PM (IST)

    आजच्या सामन्यासाठी इंग्लंडचे अंतिम 11

    इंग्लंड संघ: जोस बटलर, डेविड मलान, जॉनी बयरस्टो,  इयॉन मॉर्गन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम बिलींग्स, मोईन अली, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद, मार्क वुड

  • 10 Nov 2021 07:11 PM (IST)

    आजच्या सामन्यासाठी न्यूझीलंडचे अंतिम 11

    न्यूझीलंड संघ: केन विल्यमसन (कर्णधार), डॅरील मिचेल, मार्टीन गप्टील, जेम्स निशम, डेवॉन कॉन्वे, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, इश सोढी, टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट, अॅडम मिल्ने.

  • 10 Nov 2021 07:11 PM (IST)

    England vs New Zealand Toss Update: न्यूझीलंडने निवडली गोलंदाजी

    सामन्यात नुकतीच नाणेफेक झाली असून न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे.

Published On - Nov 10,2021 7:08 PM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.