England vs New Zealand T20 world cup Result: चुरशीच्या सामन्यात न्यूझीलंडची इंग्लंडवर सरशी, 5 विकेट्सने मात देत मिळवली अंतिम सामन्यात जागा
यंदाच्या विश्वचषकातील पहिल्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंड संघाने इंग्लंडला मात देत अंतिम सामन्यात जागा मिळवली आहे. आता पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेता संघ न्यूझीलंडशी फायलनमध्ये भिडेल.
T20 World Cup: यंदाचा टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आपल्याला अंतिम सामन्यात खेळणारी एक टीमही मिळाली. सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडला मात देत न्यूझीलंडने अंतिम फेरी गाठली आहे. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात इंग्लंडचा संघ एका क्षणी सामना जिंकेल असेच वाटत होते. पण शेवटच्या काही षटकात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी तुफान फलंदाजी करत विजय आपल्या नावे केला आहे. यावेळी नाबाद 72 धावा ठोकणारा डॅरेल मिचेल हिरो ठरला आहे.
New Zealand are in the final of the #T20WorldCup 2021 ?#ENGvNZ | https://t.co/zBjgVLo3T5 pic.twitter.com/FPGC6bK2U7
— ICC (@ICC) November 10, 2021
सामन्यात नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. पण इंग्लंडच्या फलंदाजांनी संयमी फलंदाजी करत 166 धावांची विश्वासू धावसंख्या गाठली. यावेळी जोस बटलरने 29 धावा करत चांगली सुरुवात केली. ज्यानंतर डेविड मलानने 42 धावांची धडाकेबाज खेळी केली. ज्याला मोईन अलीने नाबाद 52 धावांची फिनींशिंग देत संघाची धावसंख्या 166 पर्यंत पोहचवली.
कॉन्वे-मिचेल जोडीने खेचून आणला विजय
यानंतर 167 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर गप्टील आणि कर्णधार विल्यमसन स्वस्तात बाद झाल्यानंतर संघ फार मागे पडला. त्याचवेळी डेवॉन कॉन्वे आणि डेविड मलान यांनी एक उत्तम भागिदारी रचत संघाचा डाव सावरला. 46 धावा करुन कॉन्वे बाद होताच. जेम्स निशामने 27 धावांची फटकेबाजी करत विजय जवळ आणला. जो विजय डॅरेल मिचेलने नाबाद 72 धावांच्या खेळीसह चौकार मारुन न्यूझीलंडच्या नावे केला. न्यूझीलंडने 1 ओव्हर आणि 5 गडी राखून विजय मिळवला आहे.
न्यूझीलंडची लढत कोणाशी?
न्यूझीलंडने विजय मिळवत पुढील फेरीचं तिकीट मिळवलं आहे. आता न्यूझीलंडचा सामना सेमी-फायनल 2 मधून विजेत्या संघाबरोबर होणार आहे. दुसरी सेमीफायनलची मॅच उद्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडणार आहे. संघातील विजेत्या संघासोबत 14 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंड अंतिम सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळेल.
इतर बातम्या
(England vs New Zealand T20 world cup Match Result 2021 Know Who T20 world cup Match Highlights)