IPL 2021: सनरायजर्स हैद्राबादचं नशिब बदलणार?, राजस्थानविरुद्धच्या सामन्यासाठी जगातील उत्कृष्ट फलंदाज उतरणार मैदानात
यंदाचा सीजन सनरायजर्स हैद्राबाद संघासाठी अत्यंत निराशाजनक राहिला आहे. आधीच त्यांना एकामागोमाग एक सामन्यात पराभव मिळाल्यानंतर त्यांचा गोलंदाज टी नटराजनलाही कोरोनाची बाधा झाली होती.
मुंबई: सनरायजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघासाठी यंदाची आयपीएल 2021 (IPL 2021) अजिबात चांगली चाललेली नाही. दुसरं पर्व सुरु झाल्यानंतरही त्यांचा फॉर्म मात्र परत आलेला नाही. त्यामुळे 2016 सालीचा विजयी संघ हैद्राबाद यंदा 9 पैकी 8 सामने पराभूत झाला आहे. त्यामुळे गुणतालिकेतही सर्वात खालच्या स्थानी हैद्राबाद संघ आहे. दरम्यान आता त्यांच्या संघाती एक धाकड फलंदाज जो यंदाच्या पर्वात अजून खेळलेला नसून तो संघात परतण्याची शक्यता आहे. संघाचे प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांनी याबाबतचा इशारा दिला आहे.
हा खेळाडू म्हणजे इंग्लंडचा धाकड फलंदाज जेसन रॉय (Jason Roy). नुकत्याच म्हणजे शनिवारी 25 सप्टेंबर रोजी शारजाहमध्ये झालेल्या सामन्यात हैद्राबादला अवघ्या 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतक पत्रकार परिषदेत कोच ट्रेवर बेलिस यांनी माहिती देताना सांगितलं, ”संघातील काही परदेशी फलंदाज जे अजून खेळलेले नाहीत. त्यांना लवकरच संघात स्थान देण्याबाबत आम्ही विचार करत आहोत. पुढील सामन्यापूर्वी आमची बैठक देखील होणार आहे.” दरम्यान यातून ट्रेवर यांनी नाव न घेता जेसन रॉय लवकरच सामिल होईल. असा इशारा दिला.
टी नटराजनच्या जागीही नवीन खेळाडू दाखल
कोरोना महामारीने पुन्हा आयपीएलमध्ये शिरकाव केला सनरायजर्स हैद्राबाद संघाचा (SRH) खेळाडू आणि भारताचा गोलंदाजा टी नटराजन (T Natrajan Corona Positive) याला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे आधीच गुणतालिकेत सर्वात खाली असणाऱ्या हैद्राबादची संकट आणखी वाढली होती. त्यामुळे त्यांनी एका नव्या खेळाडूला संघात सामिल केलं आहे. उम्रान मलिक (Umran Malik) असं या खेळाडूचं नाव असून तो टी नटराजनच्या जागी संघातून खेळणारा आहे. उम्रान हा जम्मू आणि काश्मीर संघातील खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत एक टी20 आणि लिस्ट A सामने खेळले असून त्यामध्ये 4 विकेट्स घेतले आहेत. तो सध्या सनरायजर्स हैद्राबाद संघाचा नेट बोलर म्हणून खेळत असताना आता त्याला संघातही स्थान मिळालं आहे.
हैद्राबाद संघाचे उर्वरीत सामने
– 27 सप्टेंबर (सोमवार): हैद्राबाद vs राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 30 सप्टेंबर (गुरुवार): हैद्राबाद vs चेन्नई सुपरकिंग्स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 03 ऑक्टोबर (रविवार): हैद्राबाद vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 06 ऑक्टोबर (बुधवार): हैद्राबाद vs आरसीबी, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 08 ऑक्टोबर (शुक्रवार): हैद्राबाद vs मुंबई इंडियन्स, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी
हे ही वाचा
(Englands batter jason roy may play next match for Srh against rr)