‘विराट कोहली एक अपयशी कर्णधार’, आरसीबीच्या पराभवानंतर मायकल वॉन पुन्हा बरळला

आरसीबीचा कर्णधार म्हणून विराट कोहलीची यंदाची शेवटची आयपीएल होती. पण केकेआरने त्यांना पराभूत केल्याने विराटचं कर्णधार म्हणून स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आहे.

'विराट कोहली एक अपयशी कर्णधार', आरसीबीच्या पराभवानंतर मायकल वॉन पुन्हा बरळला
मायकल वॉन
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 11:02 PM

दुबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या आयपीएल कारकीर्दीतला कर्णधारपदाचा शेवटचा सामना सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध खेळला. या आयपीएल हंगामानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचं विराट कोहलीने यापूर्वीच जाहीर केले होतं. दरम्यान केकेआरकडून पराभव पत्करावा लागल्याने आरसीबीचं स्पर्धेतील आव्हान इथेच संपला असून आता विराट आरसीबीचा कर्णधार म्हणून कधीच खेळणार नाही. या सामन्यानंतर विराटबद्दल सोशल मीडियावर विविध पोस्टचा अगदी पूरच आला होता. विराटचे चाहते खूप भावूक झाले होते. पण याचवेळी भारतीय क्रिकेट संघाचा नेहमीचा टीकाकार मायकल वॉन (Michael Vaughan) याने मात्र विधान करत विराटला अपयशी कर्णधार म्हटलं आहे.

वॉनने ‘क्रिकबज’ शी बोलताना सांगितलं, ‘विराट एक कर्णधार म्हणून भारतीय संघ आणि आरसीबी या दोघांसाठी मर्यादीत ओव्हर्सच्या सामन्यात अधिक यश मिळवू शकला नाही. मागील काही काळात आरसीबी संघात उत्तम खेळाडू आले आहेत. यंदाही मॅक्सवेल, हर्षल पटेल यांनी अप्रतिम खेळ केला तरीही आरसीबी खिताबापासून दूर राहिली. त्यामुळे विराट स्वत:ला एक अपयशी कर्णधार मानेल’

कसोटी क्रिकेटमध्ये विराट उत्तम

पुढे बोलताना वॉनने विराट हा कसोटी क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करत असून तो खेळाडू आणि कर्णधार म्हणून संघाला खूप पुढे घेऊन जात असल्याचंही त्याने म्हटलं. विराटच्या नेतृत्त्वाखाली भारतीय कसोटी संघाचा विकास होत असल्याचं वॉन म्हणाला.

पराभवानंतर विराटचं मत काय?

सोमवारी झालेल्या प्लेऑफ सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने आरसीबीचा चार गडी राखून पराभव केला. या हंगामानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचं कोहलीनं आधीच जाहीर केलंय. विराट कोहली सामन्यानंतर म्हणाला, ‘मी संघात अशी संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यात तरुण खेळाडू येऊन आक्रमक खेळ दाखवू शकतील. मी भारतीय संघासाठीसुद्धा तेच करण्याचा प्रयत्न केला. मी फक्त एवढेच म्हणेन की मी माझ्याकडून 120 टक्के संघाला दिले आणि यापुढेही खेळाडू म्हणून देत राहीन.

निष्ठा खूप महत्वाची

विराट कोहली म्हणाला, ‘आता पुढील तीन वर्षांसाठी नवीन संघ तयार होईल. मी RCB साठीच खेळेल.निष्ठा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि या संघाशी माझा संबंध आयपीएलमधील माझ्या शेवटच्या दिवसापर्यंत टिकेल. केकेआरच्या हातून झालेल्या पराभवाबाबत विराट कोहली म्हणाला, ‘त्यांच्या फिरकीपटूंनी मधल्या षटकांमध्ये आमच्यावर वर्चस्व गाजवलं आणि विकेट घेत राहिले. आम्ही चांगली सुरुवात केली पण ती टिकवता आली नाही. आमच्या खराब फलंदाजीपेक्षा त्यांच्या चांगल्या गोलंदाजीबद्दल अधिक बोलायला हवे. कोहली म्हणाला, ‘आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले पण आम्ही 15 धावांनी मागे पडलो. सुनील नरेनने आज दाखवले की तो आयपीएलमध्ये सर्वाधिक वारंवार विकेट घेणाऱ्यांमध्ये का आहे. सुनील नरेन, शाकिब आणि वरुण या तिघांनीही शानदार गोलंदाजी केली आणि आमचे फलंदाज मोकळेपणाने खेळू शकले नाही.

कोहलीच्या नेतृत्वाखाली एकही ट्रॉफी नाही

जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीने टी 20 विश्वचषक 2021 नंतर भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. 19 सप्टेंबर 2021 रोजी त्याने बंगळुरुचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. विराट सात वर्षे आरसीबीचा कर्णधार होता, पण त्याच्या नेतृत्वाखाली या फ्रँचायझी संघाने आयपीएलचे एकही विजेतेपद पटकावले नाही.

इतर बातम्या

पुढच्या वर्षी IPL च्या मेगा ऑक्शनमध्ये RCB ची पुनर्बांधणी, विराट म्हणतो ‘मजबूत संघ तयार करण्याची संधी’

IPL 2021: परदेशी गोलंदाजानी तारलं त्यांच्या संघाना, सर्वाधिक विकेट्सच्या शर्यतीत ‘हे’ अव्वल गोलंदाज

IPL 2021: विराटचं स्वप्न अधुरचं, केकेआरकडून 4 विकेट्सनी पराभव, स्पर्धेतील आव्हान संपुष्टात!

(Englands Ex Captain Michael Vaughan says Virat Kohli will see himself as a failure in captaincy)

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.