IND vs ENG: ‘Virat Kohli ने फोन केला नाही, तर सचिनने त्याला कॉल करावा, तुम्ही मोठे आहात, तुमचं कर्तव्य आहे’
IND vs ENG: मागच्या काही काळापासून विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या ,करीयरमधील खूप खराब फॉर्म मधून चालला आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही.
मुंबई: मागच्या काही काळापासून विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या ,करीयरमधील खूप खराब फॉर्म मधून चालला आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यात एजबॅस्टन कसोटीसह, टी 20 आणि आता चालू असलेल्या वनडे मालिकेत (IND vs ENG) एकाही सामन्यात तो 20 धावांच्या पुढे जाऊ शकलेला नाही. वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे आणि टी 20 सीरीजसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. आता रविवारी इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यात विराटला एक संधी आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात तो भारतीय संघाकडून खेळताना दिसू शकतो. गुरुवारी ऑफ साइडच्या चेंडूचा पाठलाग करताना त्याने विकेटकीपर जोस बटलरकडे सोपा झेल दिला. भारताने हा सामना 100 धावांनी गमावला. कोहलीच्या या खराब फॉर्मवर माजी क्रिकेटपटू अजय जाडेजाने (Ajay jadeja) त्याला एक सल्ला दिलाय. “विराटने आता एक गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे सचिनला फोन केला पाहिजे” असं जाडेजा म्हणाला. 2014 साली खराब फॉर्म मध्ये असताना, कोहलीने सचिन तेंडुलकर बरोबर चर्चा केली होती. त्यानंतर कोहलीला त्याचा सूर गवसला. कोहलीनेच स्वत: हे सांगितलं होतं.
ते फक्त तेंडुलकरला समजू शकतं
“आपण या विषयावर बोलत असताना, मी 8 महिन्यापूर्वीच ही गोष्ट सांगितली होती. विराट सध्या ज्या स्थितीमधून चाललाय, ते फक्त सचिन तेंडुलकरला समजू शकतं. विराटने सचिनला फोन करावा. लंचसाठी म्हणून दोघांनी एकत्र भेटलं पाहिजे” असं अजय जाडेजा सोनी सिक्सवर सामन्यानंतरच्या कार्यक्रमात म्हणाला.
फॉर्मपासून फक्त एक फोन कॉल दूर का?
“सचिन शिवाय माझ्या डोक्यात दुसऱ्या कुणाचं नाव नाहीय. फक्त एका फोन कॉलची गरज आहे. विराटने फोन केला नाही, तर सचिनने त्याला फोन करावा. तुम्ही मोठे आहात. तुम्ही त्या फेजमधून गेलाय. कॉल करणं, तुमचं कर्तव्य आहे. सचिन विराटला फोन करेल” अशी अपेक्षा अजय जाडेजाने व्यक्त केली.
यापूर्वी सुद्धा सचिनने विराटची मदत केलीय
2014 साली विराट कोहलीने सचिन तेंडुलकरची मदत मागितली होती. त्यावेळी इंग्लंड दौऱ्यात विराट पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. पाच कसोटी सामन्यात विराटची सरासरी फक्त 13.50 होती. ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर विराट सातत्याने आऊट होत होता. त्यानंतर मुंबईत आल्यानंतर त्याने सचिन तेंडुलकरकडे मदत मागितली होती. सचिनने त्यावेळी विराटची मदत केली. त्याच्या बॅटिंग स्टान्स मध्ये काही बदल सुचवले. त्यानंतर ऑस्ट्रेलियात जाऊन विराट कोहलीने 692 धावा ठोकल्या. विराट कोहली आता त्यापेक्षाही वाईट काळातून जात आहे. अशा परिस्थितीत सचिनच त्याला योग्य ते मार्गदर्शन करु शकतो.