IPL 2021: आज सायंकाळी एकाच वेळी दोन मोठे सामने, पण साऱ्यांच्या नजरा एकाच सामन्यावर, ‘हे’ आहे कारण

आज सायंकाळाी 7 वाजून 30 मिनिटांनी एकाच वेळी आयपीएलचे दोन सामने खेळवले जाणार आहेत. एकीकडे दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हे संघ भिडणार आहेत. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैद्राबाद या संघामध्ये सामना असेल.

IPL 2021: आज सायंकाळी एकाच वेळी दोन मोठे सामने, पण साऱ्यांच्या नजरा एकाच सामन्यावर, 'हे' आहे कारण
आयपीएल
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 5:20 PM

IPL 2021: इंडियन प्रिमीयर लीगच्या प्लेऑफच्या सामन्यांना रविवारपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी फेरी सामन्यांचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज दोन सामने खेळवले जाणार असून विशेष म्हणजे हे दोन्ही सामने एकाच वेळी म्हणजेच सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी खेळवले जाणार आहेत. एकीकडे दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RCB vs DC) हे संघ भिडणार आहेत. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैद्राबाद (MI vs SRH) या संघामध्ये सामना असेल.

पण सर्वांच्या नजरा या एकाच सामन्याकडे लागणार आहेत. त्या म्हणजे मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद. याचे कारण म्हणजे मुंबई सोडता इतर तीन संघाचा विचार करता दिल्ली आणि आरसीबी याआधीच प्लेऑफमध्ये गेले असून हैद्राबाद संघाचं आव्हान याआधीच संपलं आहे. त्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीत केकेआरला टक्कर देणारा मुंबई हा एकमेव संघ आहे.

मुंबईची वाट खडतर

मुंबई इंडियन्ससाठीआजचा मोठा दिवस आहे. कारण, आजच्या सामन्यात त्यांना सनरायझर्स हैद्राबादला नमवण्यापूर्वी नाणेफेकही जिंकण गरजेचं आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांना प्रथम फलंदाजीचाच निर्णय घेणं गरजेचं आहे. प्रथम फलंदाजीच निवडून जास्तीत जास्त धावा करायच्या. धावांचं शिखर कसं बनवता येईल हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर सनरायजर्स हैद्राबादला 171 धावांच्या फरकानेच पराभूत करावं लागेल तेव्हाच ते केकेआऱला नेट रनरेटच्या शर्यतीत मागे टाकून प्लेऑफमध्ये पोहोचू शकतील.

मुंबई विरुद्ध हैद्राबाद Preview

सध्या चेन्नई सुपरकिंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरू हे संघ प्लेऑफमध्ये पोहोचले असून चौथ्या स्थानासाठी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि मुंबई इंडियन्स (MI) या संघामध्ये चुरशीची शर्यत आहे. दरम्यान केकेआरने राजस्थानवर मोठा विजय मिळवत आपलं प्लेऑफच्या दिशेने बऱ्यापैकी मोठं पाऊल टाकलं आहे. त्यामुळ आज मुंबईला हैद्राबादवर एका अत्यंत मोठ्या विजयाची गरज आहे.

आरसीबी विरुद्ध दिल्ली Preview

इंंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या पर्वातील 56 वा सामना विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RCB) आणि ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स (DC) या संघामध्ये आज सायंकाळी पार पडणार आहे. आरसीबी आणि दिल्ली हे दोघेही याआधीच प्लेऑफमध्ये गेले असल्याने आजची लढत स्पर्धेच्या दृष्टीने औपचारिक असेल. पण दोन्ही संघाचा यंदाचा फॉर्म पाहता लञत चुरशीची होणार हे नक्की!

हे ही वाचा

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्याआधीच RCBच्या गोलंदाजाकडून निवृत्तीची घोषणा, 16 मॅचचं IPL करिअर

SRH vs MI, Head to Head: मुंबई इंडियन्स आणि प्लेऑफमध्ये हैद्राबादचे आव्हान, असा आहे आता पर्यंतचा इतिहास

BCCIच्या पैशावरच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड टिकून, PCB अध्यक्ष रमीज राजा यांनी सांगितली खरी परिस्थिती, व्हिडीओ व्हायरल

(Everyones Eye on Mumbai indians vs Sunrisers Hyderabad Match as its important match for playoffs fourth position)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.