IPL गाजवणाऱ्या आंद्रे रसेल आणि सुनील नरेनला वेस्ट इंडिजने टीममधून का ड्रॉप केलं?
पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात T20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्यासाठी काल वेस्ट इंडिजने टीमची घोषणी केली आहे. वेस्ट इंडिजने टीम निवडताना दोन दिग्गजांना वगळलं.
मुंबई: पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात T20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्यासाठी काल वेस्ट इंडिजने टीमची घोषणी केली आहे. वेस्ट इंडिजने टीम निवडताना दोन दिग्गजांना वगळलं. त्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयाची मीडियात बरीच चर्चा आहे. वेस्ट इंडिजने एव्हिन लुईस आणि जॉन्सन चार्ल्स या दोघांचा वर्ल्ड कप टीममध्ये समावेश केला आहे.
त्याची एंट्री हा आश्चर्याचा धक्का
यानिक कॅरीयह या लेगस्पिन गोलंदाजाची टीममध्ये एंट्री हा आश्चर्याचा धक्का आहे. तो 2016 मध्ये शेवटचा टी 20 सामना खेळला होता. एव्हिन लुईस मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजकडून शेवटचं खेळला होता. त्यानंतर फिटनेसच्या कारणामुळे त्याचा विडिंज संघात स्थान मिळालं नव्हतं.
फिटनेसमुळे बरेच महिने टीमबाहेर
क्रिकेट वेस्ट इंडिजचे सिलेक्टर डेसमंड हेन्स आणि क्रिकेट डायरेक्टर जिमी एडम्स यांनी विडिंज खेळाडूंवर फिटनेसवरुन टीका केली होती. खासकरुन लुईसवर टीका केली होती. पण आता हेन्स यांनी लुईसला टीममध्ये संधी दिली आहे.
आयपीएल स्पर्धा दोघांनी गाजवली
वेस्ट इंडिजच्या या टीममध्ये आंद्रे रसेल आणि सुनील नरेन या दोन प्रमुख खेळाडूंना संधी मिळालेली नाही. तोच मुद्दा अनेकांना खटकतोय. आंद्र रसेल आणि सुनील नरेन दोघांमध्ये एकहाती सामना फिरवायची क्षमता आहे. भारतात होणारी आयपीएल स्पर्धा दोघांनी गाजवली आहे. भारतात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. पण या दोघांनाही संधी मिळालेली नाही.
त्याचा टॉप स्कोर फक्त 17 धावा
मागच्यावर्षी टी20 वर्ल्ड कपमध्ये आंद्र रसेल शेवटचा वेस्ट इंडिज टीममधून खेळला होता. सध्या तो वेस्ट इंडिजच्या CPL 2022 लीगमध्ये खेळतोय. रसेल ट्रिनबागो नाइड रायडर्स टीमच प्रतिनिधीत्व करतोय. बॅटने तो विशेष करामत दाखवू शकलेला नाही. त्याचा टॉप स्कोर 17 धावा आहे. त्यामुळे फॉर्मच्या आधारावर रसेलचा टीममध्ये समावेश केलेला नाही.
सुनील नरेनला का वगळलं?
सुनील नरेन 2019 पासून वेस्ट इंडिजसाठी सामना खेळलेला नाही. उपलब्ध नसल्याचा हवाला देऊन, नरेनला वेस्ट इंडिज टीममध्ये निवडलेलं नाही.