खळबळजनक! माजी IPL आणि रणजी प्लेयरला मॅच फिक्सिंगसाठी 40 लाखांची ऑफर, भारतीय क्रिकेटमध्ये काय चाललय?

मॅच फिक्सिंग (Mathch Fixing) रोखण्यासाठी विविध उपायोजना करण्यात आल्या असल्या तरी, देशांतर्गत स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये मॅच फिक्सिंग अजूनही पूर्णपणे बंद झालेली नाही.

खळबळजनक! माजी IPL आणि रणजी प्लेयरला मॅच फिक्सिंगसाठी 40 लाखांची ऑफर, भारतीय क्रिकेटमध्ये काय चाललय?
rajagopal-sathish
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 2:25 PM

चेन्नई: मॅच फिक्सिंग (Mathch Fixing) रोखण्यासाठी विविध उपायोजना करण्यात आल्या असल्या तरी, देशांतर्गत स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये मॅच फिक्सिंग अजूनही पूर्णपणे बंद झालेली नाही. इंडियन प्रिमियर लीगचा (IPL) माजी खेळाडू आणि रणजीपटूने मॅच फिक्सिंगसाठी त्याला 40 लाख रुपये ऑफर करण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला आहे. बंगळुरु पोलिसांकडे या संदर्भात तक्रार नोंदवण्यात आली आहे. तामिळनाडुतून येणाऱ्या राजगोपाल सतीश (Rajagopal Sathish) या खेळाडूने आपल्या गृहराज्याशिवाय देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये आसामचेही प्रतिनिधीत्व केले आहे.

IPL मध्ये ‘या’ संघांकडून खेळलाय  आयपीएलमध्ये सतीश किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे. सतीश बीसीसीआयची मान्यता नसलेल्या इंडियन क्रिकेट लीग स्पर्धेतही खेळला आहे. सध्या तो तामिळनाडू प्रिमियर लीग स्पर्धेत चेपॉक सुपर गिलीजकडून खेळत आहे. या स्पर्धेत सामना निश्चिती करण्यासाठी पैसे ऑफर झाल्याचा सतीशचा आरोप आहे.

तपासासाठी एक विशेष टीम

पोलिसांकडे जाण्याआधी सतीशने हा मुद्दा बीसीसीआय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये उपस्थित केला आहे. BCCI कडून निर्देश मिळाल्यानंतर पोलिसांनी औपचारिक तक्रार नोंदवून घेतली आहे. “तपासासाठी एक विशेष टीम बनवण्यात आली आहे. आरोपी बंगळुरुमध्ये असल्याचा संशय आहे” असे अधिकाऱ्याने सांगितले.

ते पोलिसांवरच अवलंबून

बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी (ACSU) युनिटकडे तपासाचे, छापेमारीचे आणि जप्तीचे अधिकारी नाहीयत. मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सिंग किंवा क्रिकेटमधल्या कुठल्याही भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणात ते पोलिसांवरच अवलंबून आहेत.

ACSU सोबत असणाऱ्या बी लोकेश यांनी बंगळुरुच्या जयानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. “तीन जानेवारीला बनी आनंद नावाच्या व्यक्तीने सतीशशी इन्स्टाग्रामवर संपर्क साधला व त्याला 40 लाख रुपयांची लालुच दाखवली. दोन खेळाडुंनी ही ऑफर स्वीकारली आहे असे त्याने सांगितले. सतीशने सॉरी म्हणून ही ऑफर नाकारली” असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर सतीशने बीसीसीआय आणि आयसीसीशी संपर्क साधून घडलेला प्रकार त्यांना सांगितला.

संबंधित बातम्या: मला कोणाच्या दबावाखाली राहायचं नाही, बुमराहसोबतच्या वादानंतर मार्को यान्सिनची प्रतिक्रिया Virat Kohli Test Captaincy: ‘तू माझा सुपरहिरो आहेस…’ विराटच्या राजीनाम्यानंतर मोहम्मद सिराज भावूक IPL 2022: ठरलं! हार्दिक पंड्या, राशिद खान, शुभमन गिल अहमदाबादकडून खेळणार, 37 कोटींमध्ये संघात समावेश

(Ex-IPL & Ranji player Rajagopal Sathish Chepauk Super Gillies Tamil Nadu Premier League alleges bribery offer to fix matches)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.