विराट कोहलीविरोधात राजकारण केलं जातंय, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा खळबळजनक दावा, म्हणाला…
एकीकडे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएलचा उत्साह, त्यानंतर बहुप्रतिक्षीत टी-20 विश्वचषकाचा थरार भारतीय क्रिकेटप्रेमींना अनुभवायचा असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) कर्णधारपद सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे.
कराची : मागील काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) कर्णधार विराट कोहली (Virat KOhli) हा टी-20 विश्वचषकानंतर कर्णधारपदावरुन पायउतार होणार असल्याची चर्चा सुरु होती. दरम्यान BCCI चे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी या चर्चेला पूर्णविराम देत विराटची कामगिरी अतुलनीय आहे. त्यामुळे बोर्ड असा कोणताच निर्णय घेणार नसून विराटच्या इच्छेनुसार तो कर्णधारपदाचा निर्णय़ घेऊ शकतो. हे स्पष्ट केले आहे. पण तिकडे पाकिस्तानमध्ये मात्र त्यांचा माजी क्रिकेट कर्णधार सलमान बटने विराट कोहलीविरोधात घाणेरडा राजकारण खेळलं जात असल्याचा आरोप केला आहे.
भारताची रनमशिन म्हणून प्रसिद्ध विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीत अनेक अप्रतिम खेळी केल्या आहेत.कर्णधार म्हणूनही त्याने त्याच्या आक्रमक अंदाजात संघाला अनेक परदेशी विजय मिळवून दिले आहेत. पण या सर्वामध्ये त्याला एकही मोठी स्पर्धा अर्थात आय़सीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे त्याच्या कर्णधारपदावर काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. याच मुद्द्यावरून पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सलमान बट्टने कोहलीच्या बाबतीत राजकारण खेळलं जात असल्याचा दावा केला. तसंच इंग्लंड दौऱ्यात विराटचे काही निर्णय़ बीसीसीआयला पटले नसल्याने ते त्याच्यावर नाराज असल्याचंही बटने म्हटलं आहे.
कोहलीचं कर्णधारपद
बटच्या या आरोपानंतर इकडे भारतात मात्र बीसीसीआय अशाप्रकारचे कोणतेच विचार करत नसल्याचं स्पष्ट झालं. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी विराट कोहलीच्या नेतृत्त्वाला संघाच्या कामगिरीशी जोडलं. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2-1 ने आघाडी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर टी 20 मध्ये विराटच्या नेतृत्त्वात टीम इंडियाच्या जबरदस्त कामगिरी केल्याचंही शाह म्हणाले. कोहलीच्या नेतृत्त्वात टीम इंडिया टी 20 किंवा वन डेमध्ये सहसा पराभूत झालेली नाही.
टी-20 विश्वचषकात विराटच करणार नेतृत्त्व
क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत. भारतानेही गेल्या आठवड्यातच टी -20 विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. महेंद्रसिंह धोनीला मेंटॉर अर्थात मार्गदर्शक म्हणून निवडण्यात आलं आहे. बीसीसीआयच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून हा बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक असल्याचं म्हटलं जात आहे.
हे ही वाचा-
विराट कोहली नेमकं कोणत्या फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडणार?
IPL 2021: सलामीला येत ‘हे’ धुरंदर उधळतात जलवा, पाहा कोण आहेत हे दिग्गज!
(Ex pakistan captain salman butt says there is dirty politics getting played against Virat Kohli)