VIDEO: दक्षिण आफ्रिकेकडून खेळलेल्या क्रिकेटपटूने आता नेदरलँड्सकडून खेळून दक्षिण आफ्रिकेला हरवलं
मॅचमध्ये टर्निंग पॉइंट ठरलेली ही जबरदस्त कॅच एकदा बघाच. क्विचत असे झेल पहायला मिळातात.
एडिलेड: नेदरलँड्सच्या टीमने रविवारी दक्षिण आफ्रिकेवर मात करुन टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजयाने शेवट केला. या मॅचमध्ये कोणीही नेदरलँड्सला विजयाच दावेदार मानत नव्हतं. पण त्यांनी सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का दिला. दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच खेळाडूने हादरा दिला. हा दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू आहे. आता हा खेळाडू नेदरलँड्सकडून क्रिकेट खेळतो.
जबरदस्त झेलमुळे खेळच बदलला
दक्षिण आफ्रिकेचा हा विभीषण नेदरलँड्सच्या खूप फायद्याचा ठरला. त्याने मॅचची दिशाच बदलून टाकली. नेदरलँड्सच्या या खेळाडूच नाव आहे, वॅन डर मर्व. त्याने महत्त्वाच्या सामन्यात कमालीची कॅच पकडली. हीच कॅच मॅचमध्ये टर्निंग पॉइंट ठरली. मर्वने आपल्याच देशाला म्हणजे दक्षिण आफ्रिकेला पराभवाच्या गर्तेत लोटलं. त्यांचं टी 20 वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आणलं.
नेदरलँड्सची खराब बॅटिंग
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून नेदरलँडसला प्रथम फलंदाजी दिली. नेदरलँडसने चार विकेट गमावून 20 ओव्हर्समध्ये 158 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या टीमला सुरुवातीपासून लय सापडली नाही. टीमने आपल्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांच्या विकेट सहज गमावल्या. अखेरीस डेविड मिलरवर टीमच्या अपेक्षा टिकून होत्या. मिलर चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पण आज तो काही करु शकला नाही.
मर्वने घेतली जबरदस्त कॅच
ब्रँडन ग्लोवरच्या चेंडूवर मिलरने पुल फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या कडेला लागला. बॅकवर्ड स्क्वेयर लेगला उभ्या असलेल्या मर्वने मागे पळत जाऊन कॅच पकडली. दक्षिण आफ्रिकेचा हा पाचवा विकेट होता. तिथूनच दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी ढेपाळली. कोणीही फलंदाज खेळपट्टीवर टिकला नाही.
Pure magic from Roelof van der Merwe!
Iconic moments like this from every game will be available as officially licensed ICC digital collectibles with @0xFanCraze
Visit https://t.co/EaGDgPxhJN today to see if this could be a Crictos of the Game. pic.twitter.com/vmSWRa8OvG
— T20 World Cup (@T20WorldCup) November 6, 2022
मर्व दक्षिण आफ्रिकेकडून खेळलाय
मर्व मूळचा दक्षिण आफ्रिकेचा आहे. तो दक्षिण आफ्रिकेकडून क्रिकेटही खेळलाय. 2009 ते 2011 दरम्यान तो दक्षिण आफ्रिकेकडून 26 मॅच खेळलाय. 2015 मध्ये त्याला नेदरलँड्सचा पासपोर्ट मिळाला. त्याचवर्षी जुलै महिन्यात त्याने नेदरलँड्सकडून डेब्यु केला. टी 20 क्रिकेटमध्ये दोन देशांच प्रतिनिधीत्व करणारा तो क्रिकेट विश्वातील पाचवा खेळाडू आहे.