BCCI on Matthew Wade : आदळआपट महागात! BCCIनं मॅथ्यू वेडला फटकारलं, कारवाईची शक्यता

मॅथ्यूच्या आदळआपटीचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर आता बीसीसीआय कारवाई करण्याच्या शक्यता आहे.

BCCI on Matthew Wade : आदळआपट महागात! BCCIनं मॅथ्यू वेडला फटकारलं, कारवाईची शक्यता
मॅथ्यूसोबत बोलताना विराटImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 9:24 AM

मुंबई :  आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये वानखेडे स्टेडियमवर इंडियम प्रिमीयर लीगमधला 67 वा सामना खेळला गेला. लीगमधली टॉपवर असलेली टीम गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (GT vs RCB) ही लढत झाली. गुजरातची टीम आधीच प्लेऑफमध्ये पोहोचली आहे. दरम्यान,  आयपीएलचा चालू हंगाम ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडसाठी (Matthew Wade) निराशाजनक ठरला आहे. त्याने आठ सामन्यांच्या आठ डावात केवळ 114 धावा केल्या. गुरुवारी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) विरुद्धच्या सामन्यातही त्याची कामगिरी विशेष नव्हती. सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वेड पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 13 चेंडूत 16 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर पंचाने वेडला एलबीडब्ल्यू आऊट केले. या निर्णयामुळे तो खूप निराश झाला होता. मॅक्सवेलच्या लेन्थ चेंडूवर वेडला स्वीप मारायचा होता. पण चेंडू थेट पॅडवर गेला. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाच्या आवाहनावर अंपायरने त्याला आऊट दिला. मॅथ्यू वेड यानं या निर्णयावर अपील करून फेरविचार घेतला. रिव्ह्यू पाहिल्यानंतर थर्ड अंपायरनेही त्याला बाद घोषित केले. यानंतर मॅथ्यूने आदळआपट केली. यावर आता कारवाईची शक्यता आहे.

BCCIनं मॅथ्यू वेडला फटकारलं

बीसीसीआयकडून कारवाईची शक्यता

निकाल आल्यानंतर मॅथ्यू वेड अधिकच संतापला. तो आधी गोलंदाज ग्लेन मॅक्सवेलशी बोलला आणि त्यानंतर पॅव्हेलियनकडे जाताना वेड विराट कोहलीशी बोलताना दिसला. प्रकरण इथेच संपले नाही. ड्रेसिंग रुममध्ये पोहोचल्यावर वेडने आपला राग व्यक्त केला आणि हेल्मेट आदळला. मग बॅट खाली आपटली. वेड ड्रेसिंग रुममधील अनेक वस्तूंची तोडफोड करतानाही दिसला. त्यांच्या या कृत्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर आता बीसीसीआय कारवाई करण्याच्या शक्यता आहे. IPL आचारसंहितेच्या कलम 2.5 अंतर्गत लेव्हल 1 च्या उल्लंघनासाठी वेड दोषी ठरू शकतो.

फेरविचार घेतला

ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर पंचाने वेडला एलबीडब्ल्यू आऊट केले. या निर्णयामुळे तो खूप निराश झाला होता. मॅक्सवेलच्या लेन्थ चेंडूवर वेडला स्वीप मारायचा होता. पण चेंडू थेट पॅडवर गेला. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाच्या आवाहनावर अंपायरने त्याला आऊट दिला. मॅथ्यू वेड यानं या निर्णयावर अपील करून फेरविचार घेतला. रिव्ह्यू पाहिल्यानंतर थर्ड अंपायरनेही त्याला बाद घोषित केले.

RCB 16 गुणांसह चौथ्या स्थानावर

वानखेडे स्टेडियमवरील या विजयासह RCB 16 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. परंतु दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल. दिल्ली हरल्यास आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचेल.

हार्दिकची अर्धशतकी खेळी

गुजरातने प्रथम फलंदाजी करताना कॅप्टन हार्दिक पंड्याच्या नाबाद (62) आणि राशिद खान नाबाद (19) यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर पाच विकेट गमावून 168 धावा केल्या. बँगलोरने हे लक्ष्य 18.2 षटकात दोन विकेट गमावून पूर्ण केलं.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.