शुबमन गिल याच्या द्विशतकानंतर सचिन इम्प्रेस;थेट सारासोबत ठरवला साखरपूडा?

शुबमन गिल याने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वनडे मॅचमध्ये शानदार द्विशतक ठोकलं. शुबमन गिलच्या या द्विशतकाच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 350 धावांचं आव्हान दिलं आहे.

शुबमन गिल याच्या द्विशतकानंतर सचिन इम्प्रेस;थेट सारासोबत ठरवला साखरपूडा?
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 7:26 PM

हैदराबाद : शुबमन गिल याने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकलं. शुबमनने अवघ्या 145 बॉलमध्ये हा कारनामा केला. शुबमन एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा पाचवा भारतीय ठरला. तसेच शुबमनने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात द्विशतक ठोकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. दरम्यान शुबमनच्या द्विशतकानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

आतापर्यंत अनेकदा शुबमन आणि साराचं नाव जोडण्यात आलंय. शुबमन-सारा एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा ही अनेकदा रंगली आहे. मात्र आता पुन्हा या दोघांची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. शुबमनने न्यूझीलंड विरुद्ध द्विशतक ठोकल्यानंतर सारा ट्विटरवर ट्रेंड झाली. अनेक भन्नाट मीम्स व्हायरल झाल्या.

हे सुद्धा वाचा

हर्ष ट्विटर यूझरने तर कहर केला. हर्षने आपल्या ट्विटर हँडलवरुन शुबमनच्या द्विशतकानंतर सारा आणि शुबमनचा साखरपुडाच ठरवला. “सचिनने शुबमनसोबत साराचा साखरपुडा ठरवला”, असा जोक करत या यूजरने सचिन आणि सारासोबतचा एक फोटो ट्विट केला आहे. मात्र हा एक विनोदाचा भाग आहे, असं अजूनही काहीही ठरलेलं नाही.

शुबमनच्या द्विशतकानंतर मीम्स व्हायरल

दरम्यान शुबमन 208 धावा करुन माघारी परतला. शुबमनने या खेळीत 19 चौकार आणि 9 सिक्स ठोकले. शुबमनने 139.60 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.

न्यूझीलंडला विजयासाठी 350 धावांचं आव्हान

टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 349 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 350 धावांचं आव्हान मिळालं आहे. टीम इंडियाकडून शुबमन गिलने सर्वाधिक 208 धावांची खेळी केली. शुबमनने या खेळीत 19 चौकार आणि 9 गगनचुंबी सिक्स ठोकलं.

शुबमनशिवाय टीम इंडियाच्या फलंदाजांना विशेष कामगिरी करता आली नाही. शुबमन व्यतिरिक्त टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्माने 34, सूर्यकुमार यादव याने 31, हार्दिक पांड्या याने 28 तर वॉशिंग्टन सुंदरने 12 धावा केल्या. या व्यतिरिक्त टीम इंडियाच्या इतर फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.