VIDEO : Faf du Plessis ची ‘दादागिरी’, आपल्या मेहुण्याला जाम धुतलं
दक्षिण आफ्रिकेचा टॉप बॅट्समन फाफ डु प्लेसी आता 38 वर्षांचा आहे. पण त्याचा खेळ अजूनही 19-20 वर्षाच्या तरुणासारखा आहे. IPL मध्ये दक्षिण आफ्रिकेचा हा बॅट्समन आतापर्यंत अनेक दमदार इनिंग खेळलाय.
डरबन : दक्षिण आफ्रिकेचा टॉप बॅट्समन फाफ डु प्लेसी आता 38 वर्षांचा आहे. पण त्याचा खेळ अजूनही 19-20 वर्षाच्या तरुणासारखा आहे. IPL मध्ये दक्षिण आफ्रिकेचा हा बॅट्समन आतापर्यंत अनेक दमदार इनिंग खेळलाय. शतकं ठोकली आहेत. आता SA 20 लीगमध्ये शतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरलाय. या शतकाची स्क्रिप्ट रचताना त्याने आपल्या मेहुण्याची जोरदार धुलाई केली. या मॅचमध्ये डुप्लेसी आणि त्याचा मेहुणा परस्परविरोधी टीममध्ये खेळत होते. जेव्हा तो गोलंदाजी करायला आला, तेव्हा डुप्लेसीने त्याला खूप वाईट पद्धतीने धुतलं.
विल्जोनच्या बहिणीबरोबर डुप्लेसीच लग्न
जोबर्ग सुपर किंग्स आणि डरबन सुपर जायंट्समध्ये सामना होता. डुप्लेसी जोबर्ग सुपर किंग्सकडून खेळत होता. हार्ड्स विल्जोन डरबन सुपर जायंट्सकडून खेळत होता. विल्जोनची बहिण डुप्लेसीची पत्नी आहे.
क्रिकेट फील्डवर भावोजी-मेहुणा आमने-सामने
24 जानेवारीला सुपर किंग्स आणि सुपर जायंट्स सामन्याच्या निमित्ताने भावोजी-मेहुण्याची जोडी आमने-सामने आली. त्यावेळी भावोजीने मेहुण्याची जोरदार धुलाई केली. डु प्लेसी सर्वच गोलंदाजांची धुलाई करत होता. पण मेहुण्याची त्याने विशेष धुलाई केली. संपूर्ण इनिंममध्ये डुप्लेसीचा स्ट्राइक रेट 194 च्या वर होता. मेहुण्या विरोधात त्याने 250 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.
A remarkable innings ? What a way to bring up the first century of the #Betway #SA20 ?
Outstanding stuff Faf ? https://t.co/iAiUDDROBF
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 24, 2023
मेहुण्याच्या गोलंदाजीवर किती धावा वसूल केल्या?
डु प्लेसीने या सामन्यात 58 चेंडूत नाबाद 113 धावा फटकावल्या. जवळपास 200 च्या स्ट्राइक रेटने धावा करताना त्याने 8 चौकार आणि 8 षटकार लगावले. डुप्लेसीने मेहुण्याच्या 14 चेंडूंवर 36 धावा चोपल्या. डरबन सुपर जायंट्स विरुद्ध शतकी खेळी करताच डु प्लेसीच्या नावाची इतिहासात नोंद झाली. तो SA 20 लीगमध्ये शतक ठोकणारा पहिला बॅट्समन ठरलाय. किती विकेटने जिंकला सामना?
डरबन सुपर जायंट्सने या सामन्यात पहिली बॅटिंग केली. जोबर्ग सुपर किंग्ससमोर त्यांनी विजयासाठी 179 धावांच लक्ष्य ठेवलं. या टार्गेटचा पाठलाग करताना डु प्लेसीने एकट्याने 113 धावा चोपल्या. जोबर्ग सुपर किंग्सने डरबन सुपर जायंट्स विरुद्धचा हा सामना 8 विकेट आणि 5 चेंडू राखून जिंकला.