Ranji Trophy: टीम इंडिया एक मॅचनंतर त्याला विसरली, त्यानेच विदर्भासाठी केली कमाल
21 वर्षानंतर त्याने विदर्भासाठी अशी कामगिरी केली
मुंबई: इतिहासाची पुनरावृत्ती होते, असं म्हणतात. टीम इंडियासाठी फक्त एक मॅच खेळून बाहेर गेलेल्या खेळाडूने आपली क्षमता दाखवून दिली. त्याने फलंदाजीच्या बळावर 21 वर्षानंतर आपल्या रणजी टीमला चांगले दिवस दाखवले. 2001 मध्ये जी कमाल झाली होती, ती त्याने आता करुन दाखवली. देशात रणजी ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. विदर्भाच्या टीमचा रेल्वे विरुद्ध सामना सुरु आहे.
कोण आहे हा फलंदाज?
तुम्ही विचार करत असाल, हा फलंदाज कोण आहे?, जो एक मॅच खेळून टीम इंडियाच्या बाहेर गेला. या बॅट्समनच नाव आहे फैज फजल. 2016 साली झिम्बाब्वे विरुद्ध वनडे सीरीज झाली. त्यावेळी त्याने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यु केला होता.
टीम इंडियासाठी फक्त एक सामना खेळला आणि बाहेर
फैज फजल हरारेमध्ये आपला पहिला वनडे इंटरनॅशनल सामना खेळला होता. पण 37 वर्षाच्या फजलसाठी तोच शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. केएल राहुलसोबत त्याने ओपनिंग केली. झिम्बाब्वे विरुद्ध त्याने शतकी भागीदारी केली होती. 55 धावांवर तो नाबाद होता. पण त्यानंतर त्याला पुन्हा टीम इंडियात संधी मिळाली नाही.
रणजीत विदर्भासाठी केली कमाल
टीम इंडियात त्याला पुन्हा स्थान मिळालं नाही. पण फैज फजलने विदर्भासाठी कमाल केलीय. रेल्वे विरुद्ध रणजी ट्रॉफी सामन्यात तो ओपनिंगला आला. फैज फजलने दोन्ही इनिंगमध्ये शतक झळकावलं. पहिल्या डावात त्याने 112 धावा आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 103 धावा केल्या. दोन शतकं झळकवून फजलने विदर्भासाठी इतिहास रचला.
21 वर्षानंतर रेल्वेने पाहिला असा दिवस
फैज फजलने विदर्भासाठी एकाच मॅचच्या दोन इनिंगमध्ये शतक झळकावलं. अशी कामगिरी बरोबर 21 वर्षांपूर्वी म्हणजे 2001 साली अमित देशपांडेने केली होती. त्याने राजस्थान विरुद्ध खेळताना असा कारनामा केला होता. अमित देशपांडेने तेव्हा दोन्ही इनिंगमध्ये शतक झळकावलं होतं. फजलच्या दोन शतकांमुळे विदर्भाची टीम रेल्वे विरुद्ध मजबूत स्थितीमध्ये दिसत आहे.