जेव्हा पाकिस्तानच्या फखर जमांने द्विशतक ठोकलं, सईद अन्वरचा रेकॉर्ड मोडला

भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) एकट्याने वन डेमध्ये तीन तीन द्विशतकं ठोकली आहेत. या पंकत्ती दिग्गजांची नावं आहेत. या यादीत पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमांचंही (Fakhar Zaman) नाव आहे.

जेव्हा पाकिस्तानच्या फखर जमांने द्विशतक ठोकलं, सईद अन्वरचा रेकॉर्ड मोडला
Fakhar Zaman Pakistan cricketer
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 10:27 AM

मुंबई : वन डे क्रिकेटमध्ये आता शतकाला तितकंस महत्त्व राहिलं नाही. कारण अनेक क्रिकेटपटूंनी आता 50 षटकांच्या सामन्यात द्विशतकं (Double century) ठोकली आहेत. भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) एकट्याने वन डेमध्ये तीन तीन द्विशतकं ठोकली आहेत. या पंकत्ती दिग्गजांची नावं आहेत. या यादीत पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमांचंही (Fakhar Zaman) नाव आहे. फखर जमाला तीन द्विशतक ठोकता आली नसली, तरी एक द्विशतक त्याच्या नावावर आहे. आजच्याच दिवशी तीन वर्षापूर्वी फखर जमाने पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वेच्या (Pakistan vs Zimbabwe) सामन्यात द्विशतक ठोकलं होतं.

यापूर्वी पाकिस्तानकडून सर्वाधिक धावसंख्येचा मान माजी सलामीवीर सईद अन्वरच्या नावावर होता. अन्वरने भारताविरुद्ध 194 धावा ठोकल्या होत्या. मात्र फखर जमाने 210 धावा करुन, पाकिस्तानकडून सर्वोच्च धावसंख्या नोंदवली होती. 20 जुलै 2018 रोजी पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात हा वन डे सामना झाला होता.

या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 1 विकेट गमावून 50 षटकात 399 धावांचा डोंगर उभा केला होता. यामध्ये फखर जमांने 156 चेंडूत 24 चौकार आणि 5 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 210 धावा ठोकल्या होत्या. त्याला इमाम उल हकने 122 चेंडूत 113 धावा करुन उत्तम साथ दिली होती. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 41.6 षटकात 310 धावांची भागीदारी रचली होती. ही त्यावेळी वन डे क्रिकेटमधील सर्वोच्च सलामीची भागीदारी ठरली होती. मात्र 5 मे 2019 रोजी आयर्लंडविरुद्ध वेस्ट इंडिजच्या जेडी कॅपबेल आणि शाई होप यांनी 365 धावांची भागीदारी रचून पाकिस्तानचा विक्रम मोडला होता.

दरम्यान, झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या नंबरवर येऊन पाकिस्तानच्या आसिफ अलीने 22 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 50 धावा कुटल्या होत्या.

झिम्बाब्वेचा मोठा पराभव

पाकिस्तानच्या 400 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा मोठा पराभव झाला होता. झिम्बाब्वेचा संघ 42.4 षटकात 155 धावांवर गुंडाळला. पाकिस्तानकडून शादाब खानने 8.4 षटकात 28 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या. पाकिस्तानने हा सामना तब्बल 244 धावांनी जिंकला होता. पाच सामन्यांच्या मालिकेतील हा चौथा सामना होता. या मालिकेतील पाचही सामने जिंकून पाकिस्तानने झिम्बाब्वेला क्लीन स्वीप दिली होती.

संबंधित बातम्या 

Eng vs Pak T20 : इंग्लंडमध्ये बाबर आझमचं वादळ, पाकिस्तानचा टी 20 मध्ये धावांचा डोंगर  

पाकिस्तानच्या बाबर आजमचा नवा रेकॉर्ड, विराट कोहलीसह अनेक दिग्गजांना टाकलं मागे

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.