T20 World cup: पाकिस्तानवर संकटांचा डोंगर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचआधी स्टार बॅट्समन बाहेर
T20 World cup: पाकिस्तानच्या अडचणीत आणखी भर पडली.
मेलबर्न: टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये आधीच पाकिस्तानची हालत खराब आहे. आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसलाय. पाकिस्तानचा स्टार फलंदाज फखर जमांला दुखापत झाली झाली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार नाहीय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच नाही, पुढच्याही सामन्यात त्याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे. कदाचित तो टी 20 वर्ल्ड कपमधून आऊट होऊ शकतो.
कधी दुखापत झाली?
फखर जमांच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. सध्या तो पाकिस्तानी क्रिकेट टीमच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. PCB चे मडिकल चीफ ऑफिसर डॉक्टर नजीब सुमरो यांनी सांगितलं की, “खेळाडू आणि मॅनेजमेंटला आधीपासूनच फखरच्या दुखापतीबद्दल माहित होतं” त्यांनी सांगितलं की, “फखर जमांच्या गुडघ्याला दुखापत आशिया कपमध्ये झाली होती. म्हणजे 7 आठवडे आधीच झाली होती. टीममध्ये पुनरागमन करण्यासाठी त्याने कठोर मेहनत केली. त्यामुळे टीममध्ये तो खेळू शकला”
डॉक्टर काय म्हणाले?
“गुडघे दुखापतीमधून 100 टक्के फिट होण्यासाठी वेळ लागणार. फखर आणि टीम मॅनेजमेंट दोघांना कल्पना होती की, टुर्नामेंटमध्ये खेळण्याचा काय धोका असू शकतो? पण तरीही आम्ही त्याला स्पर्धेत खेळवलं. तुम्ही बघितलं असेल, मागच्या सामन्यात त्याने कसं प्रदर्शन केलं” असं डॉक्टर नजीब म्हणाले.
पाकिस्तान वि दक्षिण आफ्रिका सामना कधी?
PCB मेडिकल स्टाफनुसार, “फखर जमांच स्कॅन झालय. त्यात कुठलीही नवीन दुखापत दिसलेली नाही. फखर सध्या 100 टक्के फिट नाहीय. मेडिकल टीम त्याच्यासोबत काम करतेय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 नोव्हेंबरला होणारा सामना तो खेळू शकणार नाही”
फखर जमां फक्त 1 मॅच खेळला
T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये पाकिस्तानने आतापर्यंत 3 सामने खेळलेत. या 3 सामन्यात फखर जमां फक्त एक मॅच खेळलाय. त्यात त्याने 20 धावा केल्या.