Suryakumar Yadav | सूर्यकुमार यादवला कॅप्टन बनवण्यावरुन वाद, ‘या’ दोन खेळाडूंवर अन्याय?
Suryakumar Yadav | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरीजसाठी सूर्यकुमारला बनवलय कॅप्टन. भारतीय क्रिकेट टीम येत्या 23 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच टी 20 सामन्यांची सीरीज खेळणार आहे. यासाठी सोमवारी टीमची घोषणा सुद्धा झाली. सोशल मीडियावर अनेकांनी मनातील खदखद व्यक्त केलीय.
मुंबई : टीम इंडियाच वनडे वर्ल्ड कप अभियान समाप्त झालं आहे. टीमची नजर आता 23 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु होणाऱ्या T20 सीरीजवर आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाच T20 सामन्यांची मालिका होणार आहे. या सीरीजसाठी सोमवारी टीमची घोषणा झाली. आता टीम सिलेक्शनवरुन प्रश्न उपस्थित करण्यात येत असून वाद सुरु झालाय. भारतीय फॅन्स अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील सिनियर सिलेक्शन कमिटीवर नाराज दिसतायत. कमिटीने या मालिकेसाठी आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवला कॅप्टन बनवलय. त्यावरुन फॅन्सच्या मनात राग आहे. सोशल मीडियावर फॅन्सनी आपला संताप व्यक्त केला.
सूर्यकुमार यादव वनडे वर्ल्ड कप टीमचा भाग होता. पण काही खास करु शकला नाही. त्याला एक हाफ सेंच्युरी झळकवता आली नाही. फायनलमध्ये टीमचा डाव संभाळून मोठी इनिंग खेळण्याची संधी होती. पण सूर्यकुमार यादव यात फेल ठरला. त्यानंतरही सिलेक्शन कमिटीने त्याच्यावर विश्वास दाखवलाय. याच एकमेव कारण आहे, ते म्हणजे सूर्यकुमार यादव T20 क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. पण त्याला कॅप्टन बनवण्याचा निर्णय फॅन्सना आवडलेला नाहीय. त्यांना या निर्णयाच आश्चर्य वाटलय.
टीममध्ये निवडलं नाही म्हणून कोणाचे चाहते नाराज?
टीम इंडियाची घोषणा झाली. सूर्यकुमार यादवच नाव कॅप्टन म्हणून जाहीर होताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. संजू सॅमसनला या टीममध्ये निवडलेलं नाही. त्यावर फॅन्स नाराज आहेत. संजू सॅमसनला वेस्ट इंडिज दौऱ्यावर संधी मिळाली होती. त्यानंतर आयर्लंड दौऱ्यावरही निवड झाली. पण यावेळी त्याची निवड झालेली नाही. संजूचे चाहते यामुळे नाराज आहेत.
Axar Patel – what’ve they done to my boy 😭 https://t.co/2DNQCFXZcI
— Sakthi sudhan (@sakthi_sudhan) November 20, 2023
Ruturaj being named Vice Captain ahead of Axar Patel, senior pro. Ruturaj being named Vice Captain ahead of Ishan Kishan…. WTF is going on.
Surya Kumar Yadav….. seriously ? #BCCI #BCCIShameOnYou #CricketTwitter
— NKRM Krrish (@NKRM_Krrish) November 20, 2023
ऋतुराज गायकवाडाला उपकर्णधार का बनवलं?
टीममध्ये अक्षर पटेलला सुद्धा संधी मिळालीय. दुखापतीमुळे त्याची वनडे वर्ल्ड कप टीममध्ये निवड झाली नव्हती. सूर्यकुमारच्या जागी अक्षर पटेलला कॅप्टन बनवायला पाहिजे होतं, असं अनेक फॅन्सच मत होतं. सुरुवातीच्या तीन सामन्यांसाठी ऋतुराज गायकवाडला उपकर्णधार बनवण्यात आलय. अक्षर असताना गायकवाडला ही जबाबदारी का दिली? असाही काहींचा आक्षेप आहे. अक्षर या दोघांपेक्षा सिनियर असल्याच फॅन्सच म्हणणं आहे.