T20 WC : डेव्हिड वॉर्नरने कर्णधाराचा शब्द राखला, फिंचने केलेली भविष्यवाणी खरी ठरवली

ज्या खेळाडूची क्षमता आयपीएल फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादला कधीच समजली नाही, तोच खेळाडू टी-20 विश्वचषक स्पर्धेत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट (मालिकावीर) ठरला आहे.

T20 WC : डेव्हिड वॉर्नरने कर्णधाराचा शब्द राखला, फिंचने केलेली भविष्यवाणी खरी ठरवली
David Warner
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 10:47 AM

दुबई : ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आपला कर्णधार अॅरॉन फिंचचा (Aaron Finch) शब्द राखला आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत वॉर्नरने आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला आहे. ज्या खेळाडूची क्षमता आयपीएल फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादला कधीच समजली नाही, तोच खेळाडू टी-20 विश्वचषक स्पर्धेत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट (मालिकावीर) ठरला आहे. खराब फॉर्ममधून जाणाऱ्या वॉर्नरच्या क्षमतेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, मात्र ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅरॉन फिंच मात्र त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला, त्यामुळेच वॉर्नर टी-20 विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करु शकला. (feaw months back Aaron Finch told Justin Langer, David Warner will be our Player of the tournament in 2021 T20 World Cup)

गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने अपयशी ठरणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला संघातून वगळण्यात यावं, अशी मागणी होत होती, ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्या कपाळावरही चिंतेच्या रेषा उमटल्या होत्या. अशा वेळी कर्णधार अॅरोन फिंच लँगर यांना म्हणाला, ‘Don’t Worry’ आणि आता निकाल सर्वांसमोर आहेत.

दुबई येथे खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक 2021 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव करून विजेतेपद पटकावले. कांगारू संघाचे हे पहिलेच T20 विश्वचषक विजेतेपद आहे. विश्वचषक जिंकणारा फिंच पहिला कर्णधार आहे. पण, डेव्हिड वॉर्नरची बॅट स्पर्धेत बोलली नसती तर हे सर्व शक्य झाले नसते. आयपीएलमध्ये बऱ्याच सामन्यांमध्ये वॉर्नरला बाकावर बसवून ठेवण्यात आले. वॉर्नरने टी-20 विश्वचषक 2021 सुरू होण्यापूर्वीच म्हटले होते की, “जर मी जास्त सामने खेळले नसेन, तर मी आऊट ऑफ फॉर्म आहे हे कसे आणि कोणी ठरवले.” वॉर्नरने त्याचे म्हणणे खरे करुन दाखवले, इतकंच काय तर त्याने त्याच्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.

वॉर्नरने फिंचचा विश्वास सार्थ ठरवला

अॅरॉन फिंचने सांगितले की, त्याने काही महिन्यांपूर्वी जस्टिन लँगर यांना सांगितले होते की, “डेव्हिड वॉर्नरबद्दल काळजी करण्यासारखे काही नाही. तो 2021 च्या टी-20 विश्वचषकात मालिकावीर ठरेल.” फिंचने अनेक महिन्यांपूर्वी प्रशिक्षक लँगर यांच्यासमोर केलेली भविष्यवाणी वॉर्नरने खरी केली. 2021 च्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची प्लेयर ऑफ द टूर्नामेंट म्हणून निवड झाली. त्याने या स्पर्धेत 289 धावा फटकावत शानदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात 38 चेंडूत 53 धावांची अप्रतिम खेळी खेळणाऱ्या या डावखुऱ्या फलंदाजाने 7 सामन्यात 48.16 च्या सरासरीने आणि 146.70 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या.

वॉर्नरच्या या कामगिरीनंतर कर्णधार अॅरॉन फिंचनेही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी वॉर्नरच्या निवडीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना फटकारले. फिंच म्हणाला की, “माझा विश्वास बसत नाही की हे लोक असे लिहू शकतात.” वॉर्नरने संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आणि टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.

इतर बातम्या

Video: कांगारुंची तऱ्हाच न्यारी, विश्वविजेते झाले आणि चक्क बुटात पेय टाकून प्यायले, फुल्ल टू सेलिब्रेशन

T20 world cup Final | ऑस्ट्रेलियाची एक चूक अन् ठोकले 10 चौकार, 3 षटकार; पराभवानंतरही केनच्या फलंदाजीची चर्चा

New Zealand vs Australia T20 world cup Final Result: वॉर्नरने पाया रचला, मार्शनं कळस चढवला, ऑस्ट्रेलिया टी 20 चा नवा विश्वविजेता

(feaw months back Aaron Finch told Justin Langer, David Warner will be our Player of the tournament in 2021 T20 World Cup)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.