AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, PBKS vs CSK, Purple Cap : पर्पल कॅपच्या यादीत चहल अव्वल स्थानावर, कोणत्या खेळाडूने केली आगेकूच, जाणून घ्या

आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कालच्या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या यादीत बदल झाले आहेत का?, पाहुया

IPL 2022, PBKS vs CSK, Purple Cap : पर्पल कॅपच्या यादीत चहल अव्वल स्थानावर, कोणत्या खेळाडूने केली आगेकूच, जाणून घ्या
युझवेंद्र चहलकडे पर्पल कॅप कायमImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 8:21 AM

मुंबई: आयपीएल (IPL 2022) स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. यंदाही पर्पल कॅपच्या यादीत बदल झालाय. आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील सोमवारी झालेल्या पंजब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या (PBKS vs CSK) सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे. पंजाबच्या 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने निर्धारित 20 षटकात सहा बाद 176 धावा केल्या. अंबाती रायुडूची 39 चेंडूतील 78 धावांची खेळी व्यर्थ ठरली. यात सात चौकार आणि सहा षटकार होते. पंजाबने हा सामना 11 धावांनी जिंकला. पंजाबचा आयपीएलमधील हा चौथा विजय आहे. पंजाबच्या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्सचा प्लेऑफचा (Play off) मार्ग अधिक खडतर बनला आहे. चेन्नईने आतापर्यंत फक्त दोन सामने जिंकले आहेत. पॉइंटस टेबलमध्ये ते नवव्या स्थानावर आहेत. दरम्यान, कालच्या सामन्यातील पंजाबच्या विजयाने चेन्नईचा प्लेऑफचा मार्ग अधिक खडतर बनला आहे. कालच्या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या यादीत बदल झाले आहेत का?, पाहुया

पर्पल कॅपचा मानकरी कोण?

पर्पल कॅपच्या यादीत युझवेंद्र चहल पहिल्या स्थानावर आहे. त्याने 18 विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर टी नटराजन आहे. त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये 15 विकेट घेतल्या आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर ड्वेन ब्राव्हो यांनी 14 विकेट आयपीएलच्या सीजनमध्ये घेतल्या आहेत. चौथ्या स्थानी कुलदीप यादव आहे. त्याने तेरा विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर पाचव्या स्थानी उमेश यादव आहे. त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये अकरा विकेट घेतल्या आहेत.

पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज

गोलंदाज विकेट दिलेल्या धावा
युझवेंद्र चहल26462
वानिंदू हसरंगा 24362
कागिसो रबाडा23406
उमरान मलिक 22444
कुलदीप यादव21419

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

शिखर धवन जोरात

चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात शिखरने आज 6 हजार धावा पूर्ण केल्या. विराट कोहली नंतर IPL मध्ये अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज आहे.धवनने सोमवारी सीएसके विरुद्धच्या सामन्यात 6 हजार धावांचा टप्पा गाठला. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने माहीश तीक्ष्णाच्या गोलंदाजीवर एकेरी धाव काढून सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला. शिखर धवनचं दिल्ली कॅपिटल्सकडून आय़पीएल करीयर सुरु झालं होतं. त्याने पहिल्याच सामन्यात मॅच विनिंग अर्धशतकी खेळी केली होती. 2019 ला पुन्हा तो दिल्लीच्या संघात आला. त्याआधी तो सनरायजर्स हैदराबादकडून खेळला.

इतर बातम्या 

Royal Enfield Fire : तुमच्याकडे बुलेट असेल तर तुम्ही ही बातमी बघाच! आधी इंजिनमधून धूर आणि मग जाळ

‘शिरच्छेद प्रेमाचा’ चित्रपट जून महिन्याच्या अखेर प्रदर्शित होणार, ग्रामीण भागातील कलाकारांना मिळणार मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी

Electric Car : ‘इलेक्ट्रिक कार’ चांगली आहे, पण खरेदी करताना काळजी घ्या, अन्यथा दुर्लक्ष महागात पडेल !

असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.
मोठी बातमी, भारत-पाकच्या DGMO च्या चर्चेची वेळी बदलली, आता कधी चर्चा?
मोठी बातमी, भारत-पाकच्या DGMO च्या चर्चेची वेळी बदलली, आता कधी चर्चा?.
भारताच्या हल्लावेळी गायब झालेला असीम मुनिर कुठे होता?
भारताच्या हल्लावेळी गायब झालेला असीम मुनिर कुठे होता?.
या पुढची लढाई झाली तर.. ; भारतीय सैन्य दलांचा थेट इशारा
या पुढची लढाई झाली तर.. ; भारतीय सैन्य दलांचा थेट इशारा.