Virat Kohli: एकाचवेळी 10 विराट कोहली, तुम्हीच शोधा आता ओरिजनल कुठला? नेटीझन्सच्या भन्नाट Reactions
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat kohli) सध्या ब्रेकवर आहे. मागच्या काही महिन्यांपासून सातत्याने क्रिकेट खेळत असल्याने विराट कोहलीला वेस्ट इंडिज विरुद्धच्या आजच्या सामन्यासाठी विश्रांती दिली आहे.
मुंबई: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat kohli) सध्या ब्रेकवर आहे. मागच्या काही महिन्यांपासून सातत्याने क्रिकेट खेळत असल्याने विराट कोहलीला वेस्ट इंडिज विरुद्धच्या आजच्या सामन्यासाठी विश्रांती दिली आहे. पुढच्या श्रीलंकेविरुद्धच्या (India vs Sri lanka) तीन टी-20 सामन्याच्या मालिकेतही विराट कोहली खेळताना दिसणार नाही. मैदानावर नव्या जोमाने परतण्यासाठी, रिफ्रेश होण्यासाठी विराटला ही विश्रांती दिली आहे. घरी परतल्यानंतर रिलॅक्स मूडमध्ये असलेल्या विराटने एक गमतीशीर पोस्ट केली आहे. विराटने टि्वटरवर (Twitter) एक फोटो पोस्ट करुन चाहत्यांना बुचकळ्यात टाकले आहे. चाहते सुद्धा फोटोमध्ये विराटला शोधताना वेगवेगळ्या गंमतीशीर कमेंट करत आहेत. विराटच्या व्यक्तीमत्वामध्ये दाढी खूप महत्त्वाची आहे. चाहत्यांचं विराटच्या लूकबरोबरच त्याच्या दाढीकडेही लक्ष असतं.
U have fans from all over the world, It’s unbelievable yar. Even people go crazy for u in Pakistan too. ❤️ https://t.co/BfTJx5ti8A
— दे देंगे 2 ? नाच के गिर जाओगे। (@Bako_dhyanam) February 20, 2022
This is an advertisement of @Vivo_India #V11Pro. Right???? https://t.co/uOvuZOi4Me
— ?????? ?? ?? ???????? ??? (@doibobani) February 20, 2022
Find the odd one out https://t.co/8WQi7rHqiE pic.twitter.com/XJdV5vNwFX
— Ibhuhatela2.0 (@Ibhuhatela2) February 20, 2022
दहा दाढीवाले
विराटने जो फोटो पोस्ट केलाय, त्यात त्याच्यासारखेच दिसणारे दहा दाढीवाले फोटोत दिसत आहेत. सर्वांनी एकाच रंगाचा सूटा-बुटाचा पेहराव केला आहे. सगळेच एकत्र खुर्चीवर बसून चर्चा करताना दिसतात. हा फोटो पोस्ट करताना विराटने यात विषम कोण तो ओळखा? असा मेसेज लिहिला आहे. हा फोटो आणि एक ओळीची पोस्ट यामुळे चाहते सुद्धा गांगरुन गेले आहेत. चाहते यावर वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत.
Find the odd one out. pic.twitter.com/cJCpNGmQfP
— Virat Kohli (@imVkohli) February 20, 2022
विराटच कमबॅक
ब्रेकवर जाण्याआधी विराट कोहलीने दुसऱ्या टी 20 सामन्यात शानदार अर्धशतक झळकवलं. यामुळे भारताला 186 धावांपर्यंत पोहोचता आलं. वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन वनडे सामन्यांमध्ये फ्लॉप झाल्यामुळे विराटला विश्रांती घेण्याचा अनेकांनी सल्ला दिला होता. पण टी-20 मध्ये विराटने जबरदस्त कमबॅक केलं. विराटने या मालिकेत वेस्ट इंडिज विरुद्ध एकच अर्धशतकी खेळी केली असली, तरी त्याच्या फलंदाजीत जुन्या कोहलीची झलक दिसली. त्यामुळे चाहते पुढच्या काही सामन्यात अशाच फलंदाजीची अपेक्षा करत आहेत.
मोहालीमध्ये चार मार्च पासून श्रीलंके विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत कोहली खेळणार आहे. विराटचा हा 100 वा कसोटी सामना आहे. विराटने कोहलीने दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर अचानक कर्णधारपद सोडलं होतं. भारताचा या मालिकेत 2-1 असा पराभव झाला.
find the odd one out virat kohli shares hilarious image of ten kohli