‘माझी भारतीय संघात निवड करु नका’; हार्दिक पंड्याची निवड समितीला विनंती

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला सध्या त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करायचे आहे. म्हणूनच त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवडकर्त्यांना त्याच्या नावाचा विचार करु नये, अशी विनंती केली आहे.

'माझी भारतीय संघात निवड करु नका'; हार्दिक पंड्याची निवड समितीला विनंती
'माझी भारतीय संघात निवड करु नका'; हार्दिक पंड्याची निवड समितीला विनंती
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 6:11 PM

नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला सध्या त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करायचे आहे. म्हणूनच त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवडकर्त्यांना त्याच्या नावाचा विचार करु नये, अशी विनंती केली आहे. “काही काळ माझा भारतीय संघासाठी विचार करु नये, कारण मी पूर्णपणे फिटनेस साधण्यावर लक्ष केंद्रित करत आहे”, असे त्याने निवड समितीला सांगितले आहे. पाठीच्या समस्येमुळे 2019 मध्ये झालेल्या शस्त्रक्रियेनंतर पंड्या भारत आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांसाठी गोलंदाजी करू शकलेला नाही. (Focusing on overall fitness, Hardik Pandya asks selectors to not consider him for some time)

क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, त्याचे लक्ष गोलंदाजीमध्ये कमबॅक करण्यावर देखील आहे आणि त्याने निवडकर्त्यांना वेळ देण्यास सांगितले आहे. पांड्या हा टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा भाग होता, पण तो 5 सामन्यांत फक्त दोनदा गोलंदाजी करू शकला. ज्यामध्ये त्याला यश मिळाले नाही.

कपिल देव यांनी उपस्थित केले सवाल

T20 विश्वचषकापूर्वी, आयपीएलमध्ये पंड्याच्या गोलंदाजीच्या फिटनेसवर सतत लक्ष ठेवण्यात आले होते, परंतु स्पर्धेच्या दोन्ही टप्प्यांतील एकाही सामन्यात त्याने गोलंदाजी केली नाही. पंड्याने 2019 मध्ये आयपीएलमध्ये शेवटची गोलंदाजी केली होती. पंड्या 2020 चा हंगाम केवळ फलंदाज म्हणून खेळला होता. फिटनेसमुळे पंड्याला न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या 3 टी-20 मालिकेसाठी संघात निवडण्यात आले नाही. आता तो दक्षिण आफ्रिका दौऱ्याचाही भाग नसल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी यापूर्वी म्हटले होते की, “हार्दिक पांड्याला अष्टपैलू म्हणावे इतकी गोलंदाजी तो करत नाही. त्याला अष्टपैलू म्हणायचे असेल तर या दोन्ही गोष्टी कराव्या लागतील. तो गोलंदाजी करत नसेल तर त्याला अष्टपैलू म्हणायचे का? तो दुखापतीतून सावरला आहे, त्यामुळे त्याला प्रथम गोलंदाजी करू द्या.”

हार्दीक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये नसणार?

मागील काही काळापासून ऑलराउंडर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) खास कामगिरी करत नसल्याचं दिसून येत आहे. एकेकाळी एकट्याच्या जीवावर सामना जिंकवणारा हार्दीक अलीकडे मात्र आऊट ऑफ फॉर्म असल्याचं दिसतं आहे. त्यात तो गोलंदाजीही करत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशात आगामी आयपीएलच्या (IPL 2022) लिलावासंबधी नवी माहिती समोर आली असून सध्या आयपीएल खेळणारे संघ केवळ 4 खेळाडूंनाच रिटेन अर्थात संघात कायम ठेवू शकणार आहेत. त्यानुसार मुंबईचा संघ हार्दीकचा फॉर्म पाहता त्याला रिटेन करेल अशी शक्यता फार कमी आहे.

इतर बातम्या

IND vs NZ: श्रेयस अय्यरकडून रेकॉर्ड्सचा पाऊस, पदार्पणाच्या कसोटीत शतक आणि अर्धशतक ठोकणारा पहिलाच फलंदाज

खराब बॅटिंगने लाजिरवाणा रेकॉर्ड, अजिंक्य रहाणेच्या निरोपाची वेळ, शतकवीर श्रेयस अय्यरला संधी

IND vs NZ : टीम इंडियाची भिंत ढासळतेय, चेतेश्वर पुजाराला मुंबई कसोटीतून डच्चू मिळणार?

(Focusing on overall fitness, Hardik Pandya asks selectors to not consider him for some time)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.