श्रीलंकेतून थेट इंग्लंडमध्ये, सूर्यकुमार यादवला निरोप, आणखी दोन खेळाडू इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या आगामी पर्वाची सुरुवात इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेने होणार आहे. भारतीय संघ इंग्लंड यांच्यात 4 ऑगस्टपासून पाच सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या मालिकेसाठी भारत संघबांधणी करत आहे.

श्रीलंकेतून थेट इंग्लंडमध्ये, सूर्यकुमार यादवला निरोप, आणखी दोन खेळाडू इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार?
सूर्यकुमार यादव
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 6:07 PM

लंडन : भारताचे दमदार फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्यासह फिरकीपटू जयंत यादव (Jayant Yadav) यांना इंग्लंड कसोटी मालिकेचं तिकीट लवकरच मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यांना इंग्लंडला कसोटी मालिकेसाठी पाठवण्याची तयारी सुरु आहे. शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान हे दुखापतीमुळे दौऱ्यातून बाहेर गेल्याने या तिघांना पाठवले जात आहे.

भारतीय संघ (Indian Team) व्यवस्थापनाने रिप्लेसमेंट म्हणून दोन सलामीवीरांसह एक ऑफ स्पिनर मागितला होता. त्यामुळे  शॉ, सूर्या यांच्यासह जयंतला संधी देण्यात येत आहे. शॉ आणि सूर्या यांची आयपीएलसह श्रीलंका दौऱ्यातील आतापर्यंतची कामगिरी भन्नाट आहे. तर जयंत हा वेळ पडल्यास फलंदाजी देखील करु शकत असल्याने त्याला संधी देण्यात आली आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे.

दुखापतग्रस्त खेळाडूंच्या संख्येत वाढ

समोर आलेल्या माहितीनुसार बीसीसीआय (BCCI) सध्या पृथ्वी, सूर्या आणि जयंतला इंग्लंडला पाठवण्याची तयारी करत आहे. पृथ्वी आणि सूर्या दोघेही श्रीलंका दौऱ्यावर असून जयंत भारतात आहे. भारत आणि इंग्लंडमधील पहिला टेस्ट सामना 4 ऑगस्टला खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने शुभमन गिल दुखापतग्रस्त होताच शॉला इंग्लंडला पाठवण्याची मागणी केली होती. मात्र बीसीसीआयने ती मागणी मान्य केली नव्हती. मात्र आता दुखापग्रस्त खेलाडूंची संख्या वाढल्याने बीसीसीआय तीन अतिरिक्त खेळाडू इंग्लंडला पाठवत आहे.

सुंदर दीड महिन्यासाठी संघाबाहेर

आवेश खानला सराव सामन्यात काउंटी संघाकडून खेळताना हनुमा विहारीने खेचलेल्या शॉटवर दुखापत झाली होती. तर सुंदरच्या बोटाला आधीपासूनच दुखापत होती. ज्यामुळे सराव सामन्यातही त्याने गोलंदाजी केली नाही. या दुखापतीमुळे सुंदर जवळपास दीड महिना मैदानापासून दूर राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर (दुखापतग्रस्त), जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा

राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान (दुखापतग्रस्त) आणि अर्जान नाग्वासवाला.

हे ही वाचा

IND vs ENG : भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, चार दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन

IND vs ENG : भारताचा नवखा गोलंदाज, 74 धावा देत 7 विकेट, 24 वर्षांनंतर लॉर्ड्सवर विजय

(For India vs England test Series Prithvi shaw suryakumar yadav jayant yadav likely to join indian test team)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.