IND vs SA Test | ज्या चुकीमुळे WTC चॅम्पियन बनता आलं नाही, रोहित शर्मा आज पुन्हा तीच चूक करणार का?

IND vs SA Test | भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये 2 सामन्यांची टेस्ट सीरीज आज 26 डिसेंबरपासून सुरु होत आहे. पहिला कसोटी सामना सेंच्युरियनमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात रोहित कुठल्या 11 खेळाडूंना संधी देणार? हा मोठा प्रश्न आहे. रोहित पुन्हा एकदा WTC चॅम्पियनशिपच्या फायनलमधील चुकीची पुनरावृत्ती करण्याची शक्यता आहे.

IND vs SA Test | ज्या चुकीमुळे WTC चॅम्पियन बनता आलं नाही, रोहित शर्मा आज पुन्हा तीच चूक करणार का?
Rohit Sharma Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Dec 26, 2023 | 7:54 AM

IND vs SA Test | वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमधील पराभवानंतर रोहित शर्मा पुन्हा एकदा टीम इंडियाच नेतृत्व करणार आहे. रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या सीरीजमध्ये टीम इंडियाच नेतृत्व करणार आहे. आज म्हणजे 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पहिल्या कसोटी सामन्याआधी रोहित शर्मा कुठल्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देणार? हा मोठा प्रश्न आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला, तर अस दिसतय की, रोहित शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधी चुकीची पुनरावृत्ती करु शकतो.

दक्षिण आफ्रिकेतून जे रिपोर्ट्स येत आहेत, त्यावरुन असं वाटतय की, रविचंद्रन अश्विनला पहिल्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. अश्विन कसोटी क्रिकेटमधील नंबर 1 गोलंदाज आहे. मात्र, असं असलं तरी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. वर्ल़्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धही अश्विन प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. टीम इंडियाचा WTC फायनलमध्ये पराभव झाला होता.

बॅलन्स करण्यासाठी तो बाहेर का?

त्यावेळी इंग्लंडच्या कंडीशन्स अश्विनला संधी देण्यासाठी अनुकूल नाहीत, असं कारण देण्यात आलं होतं. आता दक्षिण आफ्रिकेतही हेच कारण दिलं जाऊ शकतं. सेंच्युरियनच्या विकेटवर वेगवान गोलंदाजांचा दबदबा राहिला आहे. अशावेळी टीम इंडिया बॅलन्स करण्यासाठी अश्विनला वगळू शकते.

दक्षिण आफ्रिकेत विकेट घेण्याची त्याची क्षमता नाही का?

कसोटी क्रिकेटमधील नंबर 1 गोलंदाज अश्विनला बाहेर ठेवण्याचा निर्णय योग्य राहिल का?. आफ्रिकन भूमीवर विकेट घेण्याची अश्विनची क्षमता नाही का?. दक्षिण आफ्रिकेत अश्विनचा रेकॉर्ड खराब आहे. अश्विन दक्षिण आफ्रिकेत 6 कसोटी सामने खेळला असून त्याच्या खात्यावर 10 विकेट आहेत. हे खूपच खराब प्रदर्शन आहे. पण आकडे पाहून तुम्ही अश्विनला बाहेर ठेऊ शकत नाही. कारण मागच्या 2-3 वर्षांपासून अश्विनने आपल्या गोलंदाजीचा स्तर कमालीचा उंचावला आहे. दक्षिण आफ्रिकेतील बाऊन्सचा फायदा उचलू शकतो.

भारताकडून दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक विकेट कोणाच्या नावावर?

दक्षिण आफ्रिकेत स्पिनर्स चालत नाहीत असं ज्यांना वाटतं, त्यांची विचार करण्याची पद्धत चुकीची आहे. दक्षिण आफ्रिकेत भारतासाठी सर्वाधिक विकेट स्पिनर्सनीच घेतले आहेत. दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक विकेट अनिल कुंबळेच्या नावावर आहेत. त्याने तिथे 45 विकेट काढलेत. त्यानंतर जवागल श्रीनाथचा नंबर येतो. त्याच्या खात्यात 43 विकेट आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.