हार्दीक पंड्याला घेऊन भारतीय संघ व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, केकेआरच्या धाकड खेळाडूला मिळणार संधी!
आगामी विश्वचषकासाठी बीसीसीआयने जाहीर केलेल्या टीम इंडियामध्ये (Team India) 15 सदस्यांचा समावेश आहे. पण यातीलच काही सदस्यांनी आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी केल्याने बीसीसीआयच्या चिंतेत वाढ झाली आहे.
मुंबई : आगामी टी – 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेला 17 ऑक्टोबरपासून युएईमध्ये सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची (Indian Cricket Team) घोषणा बीसीसीआयने (BCCI) याआधीच केली आहे. पण यातीलच काही सदस्यांनी आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी केल्याने बीसीसीआयच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे संघ बदल करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान भारत हा थेट सुपर-12 मध्ये उतरणाऱ्या संघामधील एक असल्याने 15 ऑक्टोबरपर्यंत संघात बदल करु शकतो.
दरम्यान भारताचा स्टार अष्टपैलू हार्दीक पंड्या (Hardik Pandya) हा सतत दुखापतग्रस्त असल्याने संघातील त्याच्या जागेवर प्रश्न उठवले जात आहेत. यातच नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय निवडसमिती हार्दीकला एक फलंदाज म्हणून संघात ठेवणार असून केकेआरकडून यंदा धमाकेदार खेळी करणाऱ्या व्यंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) अधिकचा अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात सामिल करण्यात येऊ शकते.
पंड्या आणि अय्यर दोघेही संघात
भारताकडे विश्वचषकाच्या संघात बदल करण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत वेळ असल्याने यावेळी पीटीआयच्या रिपोर्टमध्ये संघात एक बदल केला जाण्याची माहिती दिली आहे. यावेळी हार्दीकला युएईमध्ये विश्वचषकाच्या संघात एक केवळ फलंदाज म्हणून खेळवले जाईल. तर केकेआरचा व्यंकटेश अय्यरच्या युएईमध्ये पार पडलेल्या उर्वरीत सामन्यांतील धमाकेदार फलंदाजी आणि गोलंदाजीमुळे अष्टपैलू पर्याय म्हणून संघात निवडले जाऊ शकते.
भारताचे विश्वचषकातील सामने
भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-
- भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
- भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
- भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
- भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)
इतर बातम्या
The King is Back! जगातला बेस्ट फिनिशर परतला, धोनीची मॅचविनिंग खेळी पाहून विराट कोहली खूश
(For Upcoming T20 World cup hardik pandya to play as pure batsman and kkr venkatesh iyer to be added as cover all rounder)