T20 World Cup 2021 साठी टीम इंडिया नव्या रुपात, पाहा नव्या जर्सीचे फोटो!

17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी भारतासह सर्वच देशांनी आप आपले संघ जाहीर केले आहेत. आता भारताने या भव्य स्पर्धेसाठी आपली नवी जर्सीही सर्वांसमोर आणली आहे.

T20 World Cup 2021 साठी टीम इंडिया नव्या रुपात, पाहा नव्या जर्सीचे फोटो!
टी-20 विश्वचषक
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 2:27 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) काही दिवसांपूर्वीच आगामी टी-20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup) संघ जाहीर केला. आता त्यानंतर आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघाने सोशल मीडिद्वारे याबद्दलची माहिती दिली आहे. या माहितीनुसार आगामी  टी20 विश्व चषकासाठी टीम इंडिया नव्या जर्सीमध्ये दिसणार आहे. नुकतेच संघातील खेळाडूंनी ही जर्सी घातलेले फोटोही बीसीसीआयने पोस्ट केले आहेत.

ही जर्सी एमपीएल स्पोर्ट्सने लॉन्च केली असून तेच यंदा भारतीय संघाचे अधिकृत किट स्पॉन्सर आहेत. बीसीसीआयने याबद्दलची माहिती देताना लिहिलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “या जर्सीचे रंग हे करोडो भारतीय फॅन्स जे संघाला चिअर करतात. त्यांना पाहून तयार करण्यात आली आहे.” या जर्सीला ‘बिलियन चियर्स जर्सी’ असंच नावही दिलं आहे.  सध्या भारतीय संघ घालत असलेल्या गडद निळ्या रंगासारखीच या जर्सीचा रंगही गडद आहे. पूर्वी भारत आकाशी कलरच्याच जर्सीस घालत पण अलीकडे गडद रंगाच्या जर्सी घालू लागला आहे.

टी 20 विश्वचषकासाठी भारत तयार

क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत. भारताने संघ जाहीर केला असून माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघाचा मेन्टॉर म्हणून नेमण्यात आलं आहे. धोनीला हे पद सोपवत भारताने एक नवा डाव खेळला असून सर्वांचे लक्ष भारताच्या विश्वचषक कामगिरीकडे लागले आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

इतर बातम्या

‘विराट कोहली एक अपयशी कर्णधार’, आरसीबीच्या पराभवानंतर मायकल वॉन पुन्हा बरळला

राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षकपदाला नकार, वाचा नेमकं कारण काय?

IPL 2021: सनरायजर्स हैद्राबाद वाईट वर्तवणूकीनंतरही डेव्हिड वॉर्नरला संघासोबत खेळायचंय, म्हणाला…

(For Upcoming T20 world cup Indian Cricket Team will be in new jersey See Photos of team india new jersy)

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.