WI vs IND ODI Series : 7 महिन्याची प्रतिक्षा संपणार, एक दमदार बॅट्समन वेस्ट इंडिज टूरसाठी टीम इंडियात येणार

WI vs IND ODI Series : टीम इंडियाच्या एका फलंदाजाकूडन बऱ्याच अपेक्षा आहेत. त्याच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. एकहाती मॅच फिरवू शकतो. पण आतापर्यंत त्याला मिळालेल्या संधीच सोन करता आलेलं नाहीय.

WI vs IND ODI Series : 7 महिन्याची प्रतिक्षा संपणार, एक दमदार बॅट्समन वेस्ट इंडिज टूरसाठी टीम इंडियात येणार
Team indiaImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 3:54 PM

नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर आता सर्वांच लक्ष आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. 12 जुलैपासून वेस्ट इंडिज विरुद्ध सीरीज सुरु होईल. या सीरीजमध्ये टीम इंडिया टेस्ट, वनडे आणि T20 सीरीज खेळणार आहे. WTC फायनलमधील पराभवामुळे वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरीजमध्ये टीम इंडियात अनेक बदल दिसू शकतात. युवा खेळाडूंना वेस्ट इंडिज दौऱ्यात प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात वनडे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे.

त्या दृष्टीने वेस्ट इंडिज विरुद्धची ही मालिका टीम इंडियासाठी महत्वाची आहे. या दौऱ्यात एका दमदार, आक्रमक फलंदाजाला टीम इंडियात स्थान मिळू शकतं.

त्याचं लवकरच टीम इंडियात पुनरागमन

मागच्या 7 महिन्यापासून हा फलंदाज टीम इंडियाच्या बाहेर होता. तो संधीच्या प्रतिक्षेत होता. त्याची प्रतिक्षा वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत संपू शकते. संजू सॅमसन आणि त्याच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजू लवकरच टीम इंडियात पुनरागमन करु शकतो. त्याला पुढच्या महिन्यापासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत संधी मिळू शकते.

टीम इंडियाकडून शेवटचा वनडे सामना कधी खेळला?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजू सॅमसनची वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे आणि T20 सीरीजसाठी टीम इंडियात निवड होऊ शकते. मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात संजू टीम इंडियाकडून शेवटचा वनडे सामना खेळला होता. टी 20 सामना सुद्धा तो यावर्षी जानेवारीमध्ये खेळला होता.

त्याचा स्ट्राइक रेट किती ?

संजू सॅमसनने टीम इंडियासाठी 11 वनडे सामन्यात 330 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 66 पेक्षा जास्त आहे. संजूचा स्ट्राइक रेट 104 पेक्षा जास्त आहे. वनडे सीरीज त्याच्यासाठी इतकी महत्वाची का?

संजू सॅमसनशिवाय इशान किशन सुद्धा वनडे आणि टी 20 टीमचा भाग असेल. टेस्ट सीरीजसाठी सुद्धा इशानला बॅकअप विकेटकीपर म्हणून निवडलं जाऊ शकतं. श्रीकर भरतची सुद्धा वेस्ट इंडिज टूरसाठी टेस्ट टीममध्ये निवड निश्चित मानली जातेय. संजू सॅमसनसाठी वेस्ट इंडिज विरुद्धची वनडे सीरीज महत्वाची आहे. कारण यावर्षी वर्ल्ड कप आहे. संजूने चांगलं प्रदर्शन केलं, तर त्याला वर्ल्ड कप स्क्वाडमध्ये स्थान मिळू शकतं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.