अफगानिस्तान क्रिकेट संघाला नवा गोलंदाजी प्रशिक्षक, क्रिकेट इतिहासातील दिग्गज गोलंदाजाची नेमणूक
मागील काही वर्षात आपल्या खेळात सातत्याने प्रगती करणाऱ्या अफगानिस्तान क्रिकेट टीमला यंदाच्या टी-20 विश्वचषकातील एक महत्ताचा संघ मानला जात आहे.
मुंबई : अफगानिस्तान क्रिकेट संघाने (Afghanistan Cricket Team) मागील काही वर्षात आंतरराष्च्रीय क्रिकेटमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करुन खेळामध्येही चांगली प्रगती केली आहे. संघाची सर्वात मोठी ताकद ही त्यांची फिरकी गोलंदाजी आहे. ज्यामध्ये राशिद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब अर रेहमान या टॉपच्या फिरकीपटूंचा समावेश होतो. आता या संघाच्या गोलंदाजीला आणखी बळकट करण्यासाठी संघ प्रशासनाने नवा गोंलदाजी प्रशिक्षक नेमला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज शॉन टेट(Shaun Tait) याची नेमणूक गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून करण्यात आली आहे. संघाचा मुख्य प्रशिक्षक लांस क्लूजनरसोबत शॉन काम करणार आहे. सध्या त्याचा कार्यकाळ पाच महिने इतका ठरवण्यात आला आहे.
टेटसाठी सर्वात पहिली चाचणी ही पाकिस्तान विरुद्ध खेळण्यात येणारी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका असणार आहे. 1 ते 5 सप्टेंबर दरम्यान ही मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर यूएईमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी देखील टेटला संघाला शिकवणी द्यावी लागणार आहे. टेटने ईएसपीएनक्रिकइन्फोला दिलेल्या माहितीत सांगितले की, “मागील बऱ्याच दिवसांपासून माझी अफगानिस्तान क्रिकेटसोबत याबाबत चर्चा सुरु होती. अखेर मी ही जबाबदारी स्विकारत असून संघाकडे असणाऱ्या चांगल्या गोलंदाजीला आणखी मजबूत करण्यासाठी मी सर्वोत्परी प्रयत्न करणार आहे.”
अफगानिस्तानकडे उत्कृष्ट गोलंदाज
टेट अफगानिस्तान संघाच्या काही खेळाडूंबद्दल बोलताना म्हणाला,“संघामध्ये काही उत्तम खेळाडू आहेत. यात राशिद, मोहम्मद नबीसह नवीन उल हक यानेही मागील काही काळात स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्याने सीपीएल आणि इंग्लंडच्या ब्लास्ट स्पर्धेत उत्तम गोलंदाजी केल्याने तो संघाच्या वेगवान गोलंदाजीचं भविष्य आहे.”
हे ही वाचा –
T20 World Cup 2021 साठी दोन महिन्यांपूर्वीच न्यूझीलंडचा संघ जाहीर, ‘या’ दिग्गज खेळाडूला विश्रांती
IPL 2021 साठी नियमांमध्ये बदल, बीसीसीआयकडून नवी नियमावली जाहीर
(Former australian Bowler shaun tait become Bowling coach of afghanistan cricket team)