World Cup 2023 : भारताला ‘हे’ दोन खेळाडू वर्ल्ड कप जिंकवून देतील, टीम इंडियाबद्दल मोठी भविष्यवाणी

World Cup 2023 : यंदा वनडे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याने भारताच्या वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात होईल. येत्या 8 ऑक्टोबरला टीम इंडियाचा पहिला सामना होणार आहे.

World Cup 2023 : भारताला 'हे' दोन खेळाडू वर्ल्ड कप जिंकवून देतील, टीम इंडियाबद्दल मोठी भविष्यवाणी
World cup 2023Image Credit source: AFP/BCCI
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 12:40 PM

मुंबई : यंदाचा वनडे वर्ल्ड कप 2023 भारतात होणार आहे. ऑक्टोबरमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. भारतीय टीम ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याने येत्या 8 ऑक्टोबरपासून आपल्या वर्ल्ड कप अभियानाची सुरुवात करेल. चेन्नईमध्ये हा सामना होणार आहे. त्यानंतर एक आठवड्याने 15 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये पाकिस्तान विरुद्ध मॅच होईल. 2023 वर्ल्ड कप 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. फायनल मॅच 19 नोव्हेंबरला होईल. 2023 वर्ल्ड कप सुरु व्हायला, अजून 3 महिने बाकी आहेत. आता टीम इंडियाबद्दल एक महत्वाची भविष्यवाणी झाली आहे.

भारतीय क्रिकेट टीमचा माजी ऑफ स्पिनर हरभजन सिंगने ही भविष्यवाणी केली आहे. त्याने दोन क्रिकेटपटुंची नाव सांगितली. ते भारताला यावर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवून देतील. हरभजन सिंगने हे दोन प्लेयर वर्ल्ड कप का जिंकवून देतील? ते कारण सुद्धा सांगितलं.

हरभजनने कुठल्या दोन खेळाडूंची नाव घेतली?

हरभजन सिंगने ज्या दोन प्लेयरची नाव घेतली, त्यापैकी एक आहे शुभमन गिल आणि दुसरा रवींद्र जाडेजा. हे दोघे टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देतील, असं हरभजनने सांगितलं. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना हरभजन सिंग म्हणाला की, “भारतातील खेळपट्ट्या फलंदाजांना अनुकूल आहेत. अशावेळी शुभमन गिल भारतीय विकेट्सवर धावांचा पाऊस पाडेल. तो मोठी धावसंख्या उभारेल. शुभमन गिलकडे भारतीय विकेट्सवर खोऱ्याने धावा करण्याची क्षमता आहे. 2023 वर्ल्ड कपमध्ये शुभमन गिल महत्वाचा खेळाडू असेल. भारतीय कंडीशन्समध्ये शुभमन गिल चांगला खेळ दाखवेल”

रवींद्र जाडेजा आयपीएल सारखा खेळला, तर वर्ल्ड कप 2023 तो गाजवू शकतो. त्याचा भारताला फायदा होईल. आयपीएल 2023 मध्ये रवींद्र जाडेजाने गोलंदाजी करताना 20 पेक्षा जास्त विकेट घेतल्या होत्या. वर्ल्ड कप 2023 मधील भारताच शेड्यूल

भारत विरुद्ध आस्ट्रेलिया, 8 ऑक्टोबर, चेन्नई

भारत विरुद्ध अफगानिस्तान , 11 ऑक्टोबर, दिल्ली

भारत विरुद्ध पाकिस्तान, 15 ऑक्टोबर, अहमदाबाद

भारत विरुद्ध बांग्लादेश, 19 ऑक्टोबर, पुणे

भारत विरुद्ध न्यूझीलंड, 22 ऑक्टोबर , धर्मशाळा

भारत विरुद्ध इंग्लंड, 29 ऑक्टोबर, लखनऊ

भारत विरुद्ध क्वालीफायर टीम 2 नोव्हेंबर, मुंबई

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.